महापौर चषक हॉकी स्पर्धेत राजीव गांधी विद्यालयास विजेतेपद


पिंपरी,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) -   महापौर चषक शालेय ‘टेन-20’ हॉकी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजीव गांधी विद्यालयाने एसएनबीपी स्कूलचा 5-2 गोल फरकाने पराभव करून 14 वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद प्राप्त करीत आपला दबदबा कायम ठेवला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू आहे. अंतिम सामन्यात राजीव गांधी विद्यालयाच्या रोशन कांबळे याने सुरेख खेळ करीत 2 गोल नोंदविले. ओम धनवे, आदित्य डोंगरे व आकाश मोरे यांनी प्रत्येकी 1 गोल करीत त्याला साथ दिली. पराभूत एसएनबीपी स्कूलकडून नीरज लांडगे व अथर्व कुमार हे प्रत्येकी 1 गोल करू शकले.

मुलींच्या 14 वर्षे गटाच्या अंतिम सामन्यात न्यू मिलिनियम स्कूलने एसएनबीपी स्कूलचा 4-0 गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. स्वानंदी नवले हिने 2, आदिती काकडे व अबिस्मी शशिधरन हिने प्रत्येकी 1 गोल केला. पराभूत संघाला एकही गोल करता आला नाही.
मुलांच्या 17 वर्षे गटात एसएनबीपी स्कूलने ज्योती स्कूलचा 9-1 गोल फरकाने पराभूत केले. तुषार दुर्गा याने 5 गोल करीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. जयदिप पाटील, शिवानंद तिवारी, समीर राय, धैर्य शर्मा यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. ज्योती स्कूलकडून राजेंद्र पवार एकमेव गोल करू शकला.

मुलींच्या 17 वर्षे गटात न्यू मिलिनियम स्कूलने एसएनबीपी स्कूलचा 6-0 गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद मिळविले. गौरी ढावरे हिने 2, तनिष्का येवले, सांची खुटे, सुकन्या सायकर व वेदिका काकडे हिने प्रत्येकी 1 गोल करीत सुरेख खेळ केला.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget