तान्हाजी : द अनसंग वॉरियर'चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचणार


मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियरया चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्लेविस्मरण झालेल्या शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. तसेच चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.
'तान्हाजी : द अनसंग वॉरियरहा चित्रपट टी-सिरीज आणि अजय देवगण फिल्म्स बॅनरखालील ओम राऊत दिग्दर्शित ऐतिहासिक कालखंडातील नाट्यरूपांतर चित्रपट आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्ती सहाय्यक आणि विश्वासू तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसैफ अली खान,काजोलशरद केळकरजगपती बाबू आदी मान्यवर कलाकारांचा समावेश आहे.
या भागीदारीचा एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाने आपल्या समृद्ध वारशाचा गौरव साजरा करण्यासाठी जनतेला राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अजय देवगण यांचे सहकार्य घेतले आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजींसारख्या योद्धांच्या अद्भुत शौर्याची आठवण करून देणाऱ्या किल्यांना भेट देण्याचे अश्वासित केले आहे. अशा योद्ध्यांच्या आठवणी अजूनही महाराष्ट्राच्या मौल्यवान किल्यांमध्ये आहेत. यासाठी खालीलप्रमाणे एक को-ब्रँडेड टीव्हीसी तयार केली आहे जो टीव्हीसिनेमा अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले कीआमची वारसास्थळे आजही प्रेरणादायी आहेत. ही स्थळे आपल्या विशाल इतिहासाच्या घटना जतन करतात. आपल्यातील प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कृत्याबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही सिंहगड,रायगडसिंधुदुर्गप्रतापगड इत्यादी अनेक किल्ले आहेत जे आपल्याला आपल्या गौरवशाली भूतकाळाची झलक पाहण्यास मदत करतात. लोकांनी या किल्ल्यांना भेट देण्यासाठी आणि राज्यात असलेल्या अशा ऐतिहासिक स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही चित्रपटासह को-ब्रँडेड मोहीम तयार केली आहे. अजय देवगण हे लोकप्रिय अभिनेते आणि आदरणीय व्यक्ती आहेत. त्यामुळे आमची कल्पना लोकांपर्यंत पोहचविण्याची ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. 'तान्हाजी : द अनसंग वॉरियरया चित्रपटाच्या माध्यमातून या मोहीमेचा प्रारंभ केला आहेअसे ते म्हणाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget