हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा आढावा तसेच पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री यावेळी म्हणालेपुणेपिंपरी-चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असलेल्या पीएमआरडीएचे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 साठी आवश्यक राज्य शासनाच्या मालकीची 15 हजार चौ. मी. जागा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.
            पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर- हडपसर- फुरसुंगी- शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यातअसे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पीएमआरडीएच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजनमनुष्यबळ,उत्पन्नाचे स्रोतपीएमआरडीएच्या माध्यमातून कामे सुरू असलेल्या रिंगरोडरस्तेमेट्रो मार्गिका,प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्पनगररचना योजनाटाऊनशिपइंद्रायणी नदीसुधारप्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
            मंत्रालयात आयोजित या बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमारमुख्य अभियंता विवेक खरवडकरअतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget