पीएमपीएमएलच्या बालेवाडी डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क): अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील दुसरा उत्कृष्ट राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टचे मुख्य प्रबंधक श्री. लाड यांना आणि बेस्टच्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आला. राज्यस्तरावरील उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मुरुड (रायगड), पंचवटी (नाशिक), यवतमाळ,श्रीवर्धन (रायगड), पेण (रायगड), परभणी,पीएमपीएमएल पुणेच्या बालेवाडी या डेपोंना उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आले.            
श्री. भुजबळ यांच्या हस्ते पीसीआरएच्या सक्षम-संरक्षण क्षमता महोत्सव या व्हॅनचेही उद्‌घाटन करण्यात आले.            
यावेळी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक,इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे प्रादेशिक समन्वयक सुजीत रॉय, हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे पश्चिम विभागाच्या विक्री विभागाचे मुख्य व्यवस्थापक डी.एन.कृष्णमूर्ती, लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस कपंनीचे मुख्य व्यवस्थापक तपाश गुप्ता, पेट्रोलियम कर्न्झ्व्हेशन रिसर्च असोसिएशनचे पश्चिम विभागाचे संचालक देबाशिष चौधरी तसेच याक्षेत्रात काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget