भोसरीतील 'इंद्रायणी थडी' जत्रेत महिलांना हक्काचे व्यासपीठ!पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी' जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे. 'महिला सक्षमीकरण' साठी हक्काचे व्यासपीठ निर्माण  करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे.

या जत्रेच्या यामाध्यमातून कला, क्रीडा, उद्योजकता यांसह महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे. 'महिला सुरक्षा आणि सन्मान' अशी जत्रेची थीम आहे.

नवीन वर्षात म्हणजे ३० व ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी २०२० अशी चार दिवस सकाळी १० ते रात्री १०  ही जत्रा कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर सुरू राहणार आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या साक्षी पूजा महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

जत्रेच्या नियोजनात आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याद्वारे अधिकाधिक महिला बचत गटांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले आहे. इंद्रायणी थडीचे हे दुसरे वर्ष आहे. शिवांजली सखी मंचच्या सर्व सदस्यानी जत्रेची तयारी जोरदार सुरू केली आहे.

परिसरातील अधिकाधिक महिला बचत गटांनी जत्रेत सहभागी व्हावे, हा हेतू आहे. स्टॉल बूकिंग आणि वाटपाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. अधिक माहितीसाठी शितलबाग, भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
८०० स्टॉलसाठी १३०० हुन अधिक फॉर्म...

'इंद्रायणी थडी' जत्रेत एकूण ८ टेंट उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ८०० स्टॉल लावण्यात येतील. त्यासाठी आतापर्यंत १३०० हुन अधिक फॉर्म जमा झाले आहेत. अर्जांची छाननी कारून स्टॉल वाटप केले जाणार आहे, अशी माहिती नियोजन समितीचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget