स्थायीची टक्केवारी बंद करा:पारदर्शक कारभार करा: सभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली मागणी


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
स्थायीची सभा प्रथा परंपरेने चालणार की कायद्याने हे सभापतींनी स्पष्ट करावे. जर कायद्याने चालवायची असेल तर स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. सभागृहात सभेच्या वेळी चित्रीकरण करा. महासभेसारखच स्थायीच्या सभागृहात नागरींका बसण्याची परवांनगी देवून पारदर्शक कारभार करा असे असे मत शिवसेनेचे स्थायीचे सदस्य राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. वाद वाढताच महापालिकेचे मृत्यूपावलेले कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.
स्थायी समितीची बुधवारी सभा झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सभेची सुरुवात वादातून झाली. सभा सुरु होण्यापूर्वी पूर्व बैठक झाली नसल्यांने सभेत वाद सुरु झाला.सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांना सभापतीने विश्वासात न घेता एकाधिकार शाहीने सभा चालवत असल्याचा आरोप राष्टवादीच्या नगरसेवकांनी केला. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. तर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. बुधवारी झालेल्या स्थायीच्या सभेत सदस्यांची पूर्व बैठक न घेता थेट सभा सभापतींनी सुरु आली. त्यावेळी शिवसनेचे स्थायीचे सभासद राहुल कलाटे यांनी थेट सभापती मडिगेरी यांना सभा ही प्रथा परंपरेने चालते की कायद्या प्रमाणे चालते असा प्रश्न विचारला. तर सभापतींनी कायद्या प्रमाणे चालते असे सांगितले.
सभा कायद्या प्रमाणे चालते तर टक्केवारी कशी मिळते. स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. सभेचे  चित्रीकरण करा. तुमचा पारदर्शक कारभार आहे तर जणते समोर येवू द्या असा सवाल राहुल कलाटे यांनी उपस्थित केला. त्यांना राष्ट्रवादीचे मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी साथ दिली. त्यावेळी सभापती मडिगेरी यांनी सभा माझ्या मनाप्रमाणे चालविणार असे सांगितले असता विरोधी पक्षाचे नगरसेवक भडकले. धमकी देताय का  असा आरोप विरोधी सदस्यांनी केला.
 सभा ही सदस्यांच्या मताप्रमाणे चालते. त्यासाठी कायदा आहे. असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगताच  दुसऱ्याचे ऐकून सभा चालवू नका असा टोला मयुर कलाटे यांनी सभापतींना लगावला.
यावर भाजपाचे स्थायी सदस्य शितल शिंदे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत आपण पूर्व बैठक घेवून काय निर्णय घ्यायचा आहे ते ठरवू ही सभा तहकूब करा असे सांगितले. त्यानंतर महापालिकेचे मृत्यूपावलेले कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget