दापोडीत बघ्यांचा गर्दीने अग्निशमन दलाच्या जवनासह एका कामगाराचा बळी

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 बघ्यांचा आततायीपणा अग्निशमन दलाच्या जवनासह एका कामगाराच्या जीवावर बेतलाय. सुदैवाने दोन जवान अन दोन तरुणांना जीवदान मिळाले. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. तिथंच नागेश जमादार हा पंधरा फूट खड्ड्यात काम करत होता. तेंव्हा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अचानक त्याच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला, यात गळ्यापर्यंत तो गाडला गेला. नागेश मदतीची याचना करू लागला, हा आवाज शेजारीच खेळत असलेल्या ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे यांनी ऐकला. दोघांनी कशाची ही परवा न करता ते थेट खड्ड्यात उतरले. तिथल्याच टिकाव आणि खोऱ्याने बचावकार्य सुरू केलं. वाऱ्यासारखी ही बातमी परिसरात पसरली. अन बघ्यांची गर्दी वाढू लागली. बघता-बघता ईश्वर आणि सीताराम यांनी नागेशच्या कंबरेपर्यंतची माती बाजूला केली. तितक्यात सायंकाळी 6 वाजता अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी पोहचले. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव या तिन्ही जवानांनी बचावकार्य सुरू केलं. तिन्ही जवानांनी अगदी गुडघ्यापर्यंतची माती बाजूला केली. ठेकेदार एम बी पाटीलच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग नागेशवर ओढवला. पण आता अवघ्या पंधरा मिनिटांत बचावकार्य संपणार होतं. मात्र बघ्यांचा आततायीपणा वाढला अन त्या सर्वांच्या पायाने पुन्हा मातीचा ढिगारा या तिन्ही जवानांसह नागेशच्या अंगावर कोसळला अन सहा ही जण गाढले गेले. मग आणखी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ईश्वर आणि सीताराम वरच्याच बाजूला असल्याने त्यांना शिडीच्या साह्याने बाहेर आले. तसेच काहीवेळाने सरोज आणि निखिल या दोन्ही जवानांना जीवदान मिळालं पण दुर्दैवाने विशाल जाधव यात शहीद झाले. तर मध्यरात्री साडे तीन वाजता नागेशचा मृतदेह ndrf आणि लष्कराच्या तुकडीने बाहेर काढला. बघ्यांनी आणखी पंधरा मिनिटं कळ सोसली असती तर विशाल आणि नागेश आज आपल्यात असते. तेंव्हा अशी कोणतीही घटना घडल्यास बचावकार्यात तुम्ही अडथळा ठरणार नाही, याची काळजी घ्या.

शहीद विशाल जाधव माहिती*शहीद विशाल जाधव यांचा जन्म हा साताऱ्यातील फलटण येथे झाला. त्यांचे वडील हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे मुंबईतच झालं. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलात ते 26 डिसेंबर 2012 ला रुजू झाले. तेंव्हापासून ते इथेच कार्यरत असून, रहायला मोशी येथे आहेत. मोशीत ते पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलीसह राहत होते. आता त्यांचा अंत्यविधी हा मूळगावी होणार आहे.*

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget