पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
माणसाला अनेक गोष्टींचे छंद असतात. पंढरपुरातील चांगदेव दावणे यांना कातडी चपला घालण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कातडी चपला आहेत. याच छंदापायी त्यांनी चक्क 25 हजार रुपयांची राजस्थानी माठाची चप्पल बनवली आहे. ही चप्पल 15 वर्षापूर्वी बनवली आहे. म्हणजेच त्यावेळी जवळपास एक तोळा सोन्याच्या किमतीची ही चप्पल होती.
, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?
चांगदेव दावणे हे पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चांगदेव दावणे यांची शरीरयष्टी धिप्पाड, पिळदार मिशा असा त्यांचा रूबाब. पण याच चांगदेवाला नाद लागला तो वेगवेगळ्या चपला जमवण्याचा. मागील 40 वर्षापासून त्यांनी आपला हा आगळा वेगळा छंद जोपासला आहे.
, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?
याच छंदातून त्यांनी एक चप्पल बनवून घेतली आहे. या चपलेचं नाव नागीण असं ठेवलं आहे. 2004 मध्ये तीन तळी कातड्याची सहा किलो वजनाची चप्पल त्यांनी तयार करून घेतली. यासाठी तेव्हा त्यांना 25 हजार रूपये इतका खर्च आला.
, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?
राजस्थानी माठाच्या या चपलेला त्यांनी सुंदर सजवले आहे. तिला सात नागफण्या काढल्या आहेत. चालताना आवाज यावा म्हणून शंभर घुंगरे लावली आहेत. यापेक्षाही भन्नाट म्हणजे अंधारात चप्पल चमकावी यासाठी संपूर्ण चपलेवर विविध रंगाचे लहान बल्ब लावले आहेत. यासाठी छोटी बॅटरीसुध्दा बसवली.
, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.