December 2019


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. 8300 कर्मचारी-अधिकारी यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार असून, अप्रत्यक्ष म्हणजेच निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे; अशी माहिती पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत करत महापालिका मुख्य भवनात जल्लोष केला.पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - पिंपळे गुरव येथे
कोयत्याने वार करत पत्नीचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. २३) पहाटे  घडली. 

शैला हनुमंत लोखंडे (वय 40) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. हनुमंत बाबुराव लोखंडे (वय 58, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शैला या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. त्यांना कामावरून येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि आरोपी हनुमंत यांच्यात नेहमी भांडण होत असे. सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी संतापलेल्या आरोपीने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांचा आरडा ओरडा ऐकून वरच्या मजल्यावर राहणारा सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपी पती याला ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खाजगी बसची कंटेनरला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दहा प्रवासी जखमी झालेत. ओझर्डे गावजवळ पहाटे हा अपघात झाला. दोन्ही वाहने मुंबईला जात असताना बस चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात बसची कंटेनरला जोराची धडक लागल्याने, बसच्याया समोर भागाचा चक्काचूर झाला. पुुढील तपास पोलिस करीत आहे


नागपूर :  राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  लोकप्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली.
श्री.पाटील म्हणालेबृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील सुधारित 58 (1) ब नुसार मुंबईतील गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणत: प्रत्येकी 1/3 हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिकाम्हाडा व गिरणीमालक यांना देण्याची तरतुद आहे. म्हाडास उपलब्ध होणाऱ्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी 2/3 गाळे व संक्रमण सदनिकांसाठी 1/3 गाळे बांधण्याची तरतुद आहे. म्हाडाने गिरणी कामगारांच्या माहिती संकलनासंदर्भात राबविलेल्या तीन मोहिमेमध्ये सुमारे 1 लाख 74 हजार गिरणी कामगार/त्यांच्या वारसांनी गिरणी कामगारांच्या घरांसाठी अर्ज केले आहेत. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही समिती काम करेलअसे श्री.पाटील यांनी सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरभाई जगतापभाई गिरकर आदींनी सहभाग घेतला.
0000


नागपूरदि. 21 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहद आराखडा तयार करणार असून अनुसूचित जाती व जमातीसाठींच्या योजनांवर केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी शंभर टक्के खर्च होण्यासाठी कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर कायदा करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.नितिन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडली होती.
डॉ.राऊत म्हणालेअनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येते. या शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासआहारआवश्यक शैक्षणिक साहित्य इ. सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शासकीय वसतीगृह प्रवेशाकरिता तसेच स्वयम् योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी 285 व मुलींसाठी 210 अशी एकूण 495 शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांची एकूण मंजूर क्षमता 58795 इतकी असून त्यापैकी 53355 विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश देण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या 20000 संख्येच्या मर्यादेत विद्यार्थ्यांना स्वयम् योजनेचा लाभ देण्यात येत असून चालू वर्षी त्यापैकी 7119 विद्यार्थ्यांना आतापर्यंत येाजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता डहाणू प्रकल्प कार्यालयांतर्गतच्या 17 वसतीगृहांसाठी एकूण 1849 अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी वसतीगृहाची एकूण मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता 1450 व वसतीगृहाच्या इमारतींमध्ये जागा उपलब्ध असल्याने वाढीव 100 अशा एकूण 1550 विद्यार्थ्यांना माहे 15 डिसेंबर 2019 पर्यंत प्रवेश देण्यात आलेला आहे. तसेच स्वयम् योजनेंतर्गत ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर 42 विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयम् योजनेच्या लाभासाठी कॉलेज स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित असून कॉलेज स्तरावरुन हे अर्ज त्वरीत निकाली काढण्यासाठी प्रत्येक कॉलेजसाठी प्रकल्प क्षेत्रातील कर्मचाऱ्याची नियुक्त करण्याबाबत प्रकल्प अधिकारीडहाणू यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांना त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या मदतीने एक आदिवासी विद्यार्थीनी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली असल्याचेही डॉ.राऊत यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुकेविक्रम काळेआंबादास दानवेजोगेंद्र कवाडेश्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.


नागपूर : पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षापासून सुरु आहे. यामध्ये शिरवळ ते लोणंद व फलटण ते बारामती रस्त्याचे काम सध्या अपूर्ण असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातीलअसे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य रामहरी रुपनवर यांनी मांडली.
यावेळी श्री.राऊत म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या कामामध्ये बारामती-फलटणरा.मा.10 कि.मी. 42/400 ते 64/300 (एकूण लांबी 29.90 कि.मी.) आणि शिरवळ-लोणंद-फलटण कि.मी. 80/00 ते 136/00 (एकूण लांबी 56.00 कि.मी) अशी एकूण 77.90 कि.मी. लांबीचा एकूण रु. 355.65 कोटी रकमेचे चौपदरीकरणाचे काम खासगीकरणांतर्गत हाती घेण्यात आले होते. रस्त्याचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 35 टक्के वेळीच भूसंपादन न झाल्यामुळे ऑक्टोबर 2012 पासून काम बंद आहे. या संबंधीच्या सर्व अडचणी सोडवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री श्री.राऊत यांनी दिली.
यावेळी उपसभापतींनीही या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देश दिले.


नागपूर : रायगड जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत माता व बालकांसाठी शालेय मुलांसाठीक्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण इत्यादी आरोग्यविषयक बाबींसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये अनियमितता असल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार असल्याने  या योजनेतील अनियमिततेची विभागामार्फत चौकशी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली.
या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरेरणजित पाटील आदींनी सहभाग घेतला.


नागपूर, PP : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी पूर्वीच्या प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्याबाबत राज्यशासन विचार करत असून लवकरच याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिली.
विधानपरिषदेत सदस्य श्री. विक्रम काळे यांनी कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर ते बोलत होते.
श्री. थोरात म्हणाले कीविनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रचलित पद्धत होती. मात्रती बंद करण्यात आली आहे. या शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अनुदान देण्याच्या अटीसंदर्भातही योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणारडॉ. रणजित पाटीलप्रा. अनिल सोलेश्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला.


नागपूर,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :  शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावायासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
विधानपरिषदेत सदस्य ख्वाजा बेग यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. देसाई बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले कीनागपूर कराराप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणाचे प्रमाण पुरेसे आहे. याचप्रमाणे कोकणातील तरुणांचेही लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे. या दोन्ही विभागातील तरुणांचे नोकऱ्यांमधील प्रमाण आणखी वाढावेयासाठी येथील तरुणांना स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
या चर्चेत सदस्य श्री. बेगडॉ. रणजित पाटील,श्री. जोगेंद्र कवाडे आदींनी भाग घेतला.


नागपूर,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील केंद्रे तातडीने सुरु करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनला दिले. याबरोबरच धान खरेदीत दिरंगाई होवू नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.
            भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाला 2019-20 या खरीप हंगामाकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी योजनअंतर्गंत मिटेवाणी, बघेडा, बेळगाव, भंडारा,वरठी व कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या परवानगीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी श्री. पटोले यांनी शेतकऱ्यांची धान खरेदी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पाऊस आणि लांबलेल्या धान खरेदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी खरेदीसंदर्भात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला आमदार राजु माणिकराव कारेमोरे, जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन, महाराष्ट्र राज्य को.ऑप.फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.0


नागपूर टाईम न्युजलाईन नेटवर्क)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधासभेमध्ये बोलताना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ असे महाविकास आघाडीकडून सातत्याने सांगितले जात होते. अखेर ती घोषणा आज करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असे म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंतच कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून फक्त विरोधाची भूमिका घेत आहे. आधीच्या सरकारला शक्य झाले नाही ते आम्ही करुन दाखवलं असं उत्तर दिलं.


नागपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपानं सभागृहाचं कामकाज बंद पाडलं होतं. तर दुसऱ्या दिवशी भाजपानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. यावेळी शिवसेनेचे आमदारांही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.
भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. याव्यतिरिक्त शिवसेने नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीदेखील मध्यस्थीचा प्रयत्न केला. शिवसेना भाजपा आमदार समोरासमोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि रवींद्र वायकर यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात घडलेला अत्यंत चुकीचा प्रकार होता. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणंदेखील चुकीचं आहे, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असंही ते म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसंच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.


Nagpur(timenewsline network)“Around Rs.6,600 crore has been sanctioned by the state government to help farmers affected by the untimely rains in the state, out of which Rs. 2100 crore has been disbursed. The state government has demanded Rs 14,600 crore to the central government to help the flood victims and farmers who faced heavy loss due to untimely rain” stated Finance Minister Jayant Patil. 
He was speaking in the Legislative Assembly while responding to opposition parties when they demanded financial assistance for farmers.
Mr. Patil further informed that allocation of assistance through the state government was underway. Out of the approved Rs 6600 crore, Rs 2100crore had been disbursed through the Collector. The process of depositing the remained balance was in progress.
 “The state government has demanded Rs 7400 crore for the help of flood-hit people and Rs 14,600 crore for the help of the farmers affected by the untimely rains. The state government will give strong support and help to afflicted farmers in the state” promised Finance Minister.Nagpur,(timenewsline network): ‘Maharashtra Ahead’ and ‘Lokrajya’ magazines are published by the Directorate General of Information and Public Information.  CM Uddhav Thackeray at Ramgiri unveiled ‘Maharashtra Ahead’ and Hindi, Gujarati, and Urdu editions of ‘Lokrajya’- issue November- December 2019. Secretary of the department and Director General Brijesh Singh, Director (News & Information) Suresh Wandile were present at that time.
The magazine includes articles on CM Shri. Thackeray’s oath ceremony, introduction of Chief Minister, all state cabinet members, and the short introduction of 288 MLA won in recent state assembly elections. The magazine also includes various articles that shed light on various aspects of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, on the occasion of his Mahaparinirvan Day. A special article about Guru Nanak on his birth anniversary is included in the issue. These issues are available everywhere.


नागपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थ मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
            नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधीपक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देतांना अर्थ मंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6600 कोटी रुपयांपैकी 2100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
            राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.


नागपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : जनता के आशीर्वाद और समर्थन के बल पर यह सरकार स्थापित हुआ है. जनता को दिए हुए वचन और उनकी आशा आकांक्षाओं को पूर्ण करेंगेऐसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा. साथ ही  राज्य के किसानों को कर्जमुक्त ही नहीं बल्कि चिंतामुक्त करने की दिशा से प्रयास किए जा रहे हैऐसा भी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज बताया.
विधीमंडल के शीत सत्र की पूर्वसंध्या पर रामगिरी पर हुई पत्रकार परिषद में मुख्यमंत्री ठाकरे बोल रहे थे. इस समय वित्त मंत्री जयंत पाटील,राजस्व मंत्री बालासाहेब थोरातगृहमंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईग्रामविकास मंत्री छगन भुजबलसार्वजनिक लोकनिर्माण (सार्व.उपक्रम छोड़कर) डॉ.नितिन राऊतविधायक अशोक चव्हाणदिवाकर रावते आदि मान्यवर उपस्थित थे.
मुख्यमंत्री ठाकरे ने कहा,  नागपुर में मुख्यमंत्री के रूप में पहली बार आया हूं. राज्य की उप राजधानी में कल से शुरु होनेवाले विधिमंडल के अधिवेशन से मुख्यमंत्री के रुप में मेरा कार्यकाल शुर ह्यो रहा है. राज्य की माताओं और बहनों की शुभकामनाएंउनके आशीर्वाद यह हमारी ताकत है. उनकी इस शक्ति के जोर पर हम जनता की अपेक्षाओं पर खरा उतरेंगेऐसा श्री.ठाकरे ने इस समय कहा.
अधिवेशन के माध्यम से संपूर्ण राज्य की जनता की समस्याओं को न्याय दिलाने का प्रयास किया जाएगा. किसानों को कर्जमुक्त ही नहीं बल्कि चिंतामुक्त करने की ओर हम राह पर हैऐसा मुख्यमंत्री ने बताया. हम जनता को दिए वचन पूर्ण करेंगे और उनके प्रश्नों पर कृति के माध्यम से उत्तर देंगेऐसा मुख्यमंत्री ने बताया.  राज्य में किसी भी विकास कार्य को स्थागिति नहीं दी हैऐसा भी उन्होंने इस समय स्पष्ट किया.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
माणसाला अनेक गोष्टींचे छंद असतात. पंढरपुरातील चांगदेव दावणे यांना कातडी चपला घालण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कातडी चपला आहेत. याच छंदापायी त्यांनी चक्क 25 हजार रुपयांची राजस्थानी माठाची चप्पल बनवली आहे. ही चप्पल 15 वर्षापूर्वी बनवली आहे. म्हणजेच त्यावेळी जवळपास एक तोळा सोन्याच्या किमतीची ही चप्पल होती.

, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?

चांगदेव दावणे हे पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चांगदेव दावणे यांची शरीरयष्टी धिप्पाड, पिळदार मिशा असा त्यांचा रूबाब. पण याच चांगदेवाला नाद लागला तो वेगवेगळ्या चपला जमवण्याचा. मागील 40 वर्षापासून त्यांनी आपला हा आगळा वेगळा छंद जोपासला आहे.

, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?

याच छंदातून त्यांनी एक चप्पल बनवून घेतली आहे. या चपलेचं नाव नागीण असं ठेवलं आहे. 2004 मध्ये तीन तळी कातड्याची सहा किलो वजनाची चप्पल त्यांनी तयार करून घेतली.  यासाठी तेव्हा त्यांना  25 हजार रूपये इतका खर्च आला.

, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?

राजस्थानी माठाच्या या चपलेला त्यांनी सुंदर सजवले आहे. तिला सात नागफण्या काढल्या आहेत. चालताना आवाज यावा म्हणून शंभर घुंगरे लावली आहेत. यापेक्षाही भन्नाट म्हणजे अंधारात चप्पल चमकावी यासाठी संपूर्ण चपलेवर विविध रंगाचे लहान बल्ब लावले आहेत. यासाठी छोटी बॅटरीसुध्दा बसवली.

, एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?

घरची परिस्थिती  बिकट असतानाही चांगदेव यांनी आपला छंद जोपासला आहे. चांगदेव मामा जेव्हा ही राजस्थानी माठाची नागीण चप्पल घालून चालतात तेव्हा त्यांचा रूबाब हा पाहण्यासारखा असतो. चांगदेव यांच्या या छंदावरून हौसेला मोल नसते हे अधोरेखित होतं.पिंपरी ( टाईम न्युजलाईन नेटवर्क)

 पिंपरी चिंचवड़ शहर में 15 साल की नाबालिग की हत्या का मामला उजागर हुआ है ।बच्ची के साथ दुष्कर्म करने की बात भी सामने आई है ।  सौताले पिता ने ही बच्ची की हत्या की गई है। आरोपी पिता की तलाश मी पुलिस जुटी है । यह घटना पुणे के दापोड़ि इलाके में उजागर हुई है।पुलिस ने हत्या और पोस्को के तहत मामला दर्ज कराया गया है। 
पोलीस जानकारी के अनुसार , गूरवार की   देर रात 15  साल की नाबालिग की सौतेले बाप ने है हत्या करने की वारदात घटी है। पिता ने है बच्ची का गला दबाकर मौत के घाट उतार दिया। मृतक की बहन स्कूल से वापिस आने के बाद घर पर ताला दिखा, स्थानीय नागरिक ने ताला तोड़कर घर में देखा तो बच्ची की लाश पड़ी थी, और सौतेले पिता वहसे फरार थे। घटना की जानकारी तुरन्त भोसरी पुलिस को दी गई। पुलिस ने तुरंत घटनास्थल पहुंच कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया, और आरोपी की तलाश में जुटी है। पुलिस ने बताया के बच्ची के साथ दुष्कर्म की बात डॉक्टर ने बताई हे। सौतेले पिता को तीन बच्ची या थी, मृतक के साथ सौतेला पिता का बारबार झगड़ा होता था। जिसके चलते सौतेले पिता ने बच्ची को मौत के घाट उतार कर फरार हो गया है। पुलिस ने आरोपी पिता पर पोस्को और हत्या का मामला दर्ज कराया गया है। 


आरोपी पिता रिक्शा चालक है, पिछले 7 साल से वहीं परिवार के साथ रहता था। कई बार बच्चियों के साथ छोटी छोटी बात को लेकर झगड़ा होता था, इसी झगड़ो को लेकर सौतेले पिता ने बच्ची को मौत के घाट उतार दिया .आगे की जांचं पुलीस निरीक्षण शंकर औताडे कर रहे.

Pimpri, (Timenewsline network) – A 14 year old girl was found murdered on Thursday 12 Dec morning  at her resident in Dapodi.
Mother of the girl has registered a complaint against this incident in Bhosari police station. In which she says that there were fights between her gaughter and stepfather on Thursday too they had a fight after which she went to work and her daughter was found dead in her house.

Since the incident 44 year old step father is missing or either on run. A team of police is on his search.The girl is daughted to be raped.Bhosari Police inspector shankar aoutade are investigating the case.  


·     : विनंती पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वीकारण्याचे सरन्यायाधीशांना साकडे
 मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वाधिकारे स्वीकारावे, अशी विनंतीही आयोगाने केली आहे. फाशी रद्द करणे म्हणजे पीडितेला न्याय नाकारणे आणि तसा अधिकार उच्च न्यायालयाला नाही,” असा युक्तिवाद आयोगाने केला आहे.
            आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देशाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना पाठविलेल्या या पत्रामध्ये गहुंजे बलात्कार व खून प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेण्याची विनंती केली आहे. फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. तसेच राज्यघटनेच्या कलम ७२ अन्वये दयेचा अर्ज मा. राष्ट्रपतींनी फेटाळलेला असताना फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नाही. तसेच फाशी देण्यातील दिरंगाईमुळे ती रद्द करता येऊ शकते; पण तो अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेच शत्रुघ्न चव्हाण विरूद्ध भारत सरकार या खटल्यात दिला आहे, याकडे आयोगाने लक्ष वेधले आहे.   
            “गहुंजे प्रकरणातील पडितेच्या मारेकरयांना, त्यांच्या कौर्याला केवळ शिक्षेच्या अंमलबजावणीमधील दिरंगाईमुळे फाशी होत नाहीहे पचवणे अतिशय अवघड आहे. म्हणूनच मा. उच्च न्यायालयाचा निर्णय मनाला पटणारा नाही. बारा वर्षांनंतरही पीडितेला न्याय मिळत नाही, हे अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे आम्ही मा. सरन्यायाधीशांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेचा न्याय नक्की मिळण्याची खात्री वाटते आहे,” अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी व्यक्त केली.
  
१ नोव्हेंबर २००७ रोजी पुण्यातील एका प्रथितयश बीपीओ कंपनीमध्ये काम करणारया २२ वर्षीय युवतीचा गहुंजेजवळ बलात्कार आणि खून झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. हे कृत्य करणारे कॅबचा चालक पुरुषोत्तम दशरथ बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप यशवंत कोकडे याला पुण्यातील सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये फाशी ठोठावली. पुढे लगेचच २५ सप्टेंबर २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली. ८ मे २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही या फाशीवर शिक्कामोर्तब केले. २६ मे २०१७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती मा. श्री. प्रणव मुखर्जी यांनी या दोघांच्या दयेचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर फाशीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, ही फाशी देण्यात दिरंगाई झाल्याने २९ जुलै २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फाशी रद्द करून त्या दोघा दोषींना जन्मठेप ठोठावली. मा. उच्च न्यायालयाच्या या आश्चर्यकारक व धक्कादायक निकालावर मोठी प्रतिक्रिया उमटली होती. फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलल्याने पीडितेला न्याय मिळालेला नाहीअशी तीव्र भावना समाजात निर्माण झाली. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३मधील अधिकारांचा वापर करून या प्रकरणातील न्यायालयीन लढाईत सहभागी होण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
            त्यापार्श्वभूमीवर आपल्या विनंती पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वीकारण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली आहे. या पत्रात आयोगाने प्रमुख पाच मुद्द्यांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाद मागितली आहे. 
ते मुद्दे पुढीलप्रमाणे :
१.    केवळ दिरंगाईच्या आधारे फाशी रद्द करणे, हे पीडितेला न्याय नाकारणारे आहे. त्याबाबत समाजाची भावना अतिशय तीव्र आहे.
२.    फाशीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे. मग ती रद्द करण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाचा आहे.
३.    यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदललेली आहे. पण तो अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाचा आहे.
४.    राज्यघटनेतील कलम ७२ अन्वये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला असताना फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे का, याबाबतचा अंतिम निवाडा अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
५.    या प्रकरणात उच्च न्यायालयाने फाशी रद्द करताना अधिकाराची लक्ष्मणरेषा (“ultra vires”) ओलांडली आहे. यामुळे पीडितेचा हक्क व न्याय यांच्यावर गदा आली आहे.वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवार सुबह लोनावला के कार्लागढ़ पर परिवार की कुल देवी 'एकवीरा' के मंदिर में दर्शन के लिए पहुंचे। इस दौरान पत्नी शर्मीला और बेटे आदित्य ठाकरे भी उनके साथ मौजूद थे। सभी वहां आयोजित विशेष पूजा में शामिल हुए। मुख्यमंत्री बनने के बाद उद्धव पहली बार कुल देवी के दर्शन के लिए पहुंचे थे।
एक विशेष हेलीकॉप्टर से लोनवाला पहुंचे सीएम उद्धव तकरीबन एक घंटे तक यहां रहे और फिर छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थान, शिवनेरी किले के लिए रवाना हुए। बता दें कि उद्धव इससे पहले साल 2014 में भाजपा के साथ फिर से गठबंधन से पहले अपने 63 विधायकों संग पहुंचे थे। इस बार वे भाजपा से अलग होने के बाद यहां आएहैं।
सीएम के दौरे से पहले इलाके में कड़ा सुरक्षा बंदोबस्त किए गए थे। शिवनेरी किले पर परिवार संग पहुंचे उद्धव ठाकरे ने छत्रपति शिवाजी महाराज के पालने को हाथ से झुलाया और राजमाता जीजाबाई (जिजाऊ) की प्रतिमा के दर्शन किए। यहां भी वे तकरीबन एक घंटे तक रहे और वहां देखरेख करने वाले लोगों से बातचीत की।
पिछले साल शिवनेरी किले की मिट्‌टी लेकर अयोध्या गए थे ठाकरे
उद्धव ठाकरे ने कहा-बचपन से मैं यहां आता रहा हूं, लेकिन मुख्यमंत्री बनने के बाद मैं पहली बार यहां आया हूं। यह छत्रपति शिवाजी महाराज का जन्मस्थान हैं। आपको याद होगा, पिछले साल मैं यहां आया था और यहां से मिट्टी लेकर अयोध्या गया था। कोई इसे माने या ना माने, लेकिन नवंबर से नवंबर तक जो भी रिजल्ट आया वह अच्छा आया। मुझ पर जो भी जिम्मेदारी है वह अप्रत्याशित रूप से आई है। इसका मतलब ये हैं कि शिवराय और जिजाऊ का आशीर्वाद मुझ पर हैं।पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क): – संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्व खासदारांना स्वस्तात जेवण मिळत होते. त्यामुळे देशाच्या तिजोरीवर १७ कोटींचा बोजा पडत होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद कॅन्टीनमध्ये खासदारांना स्वस्त जेवण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून दिली जाणारी सबसिडी रद्द करण्याचा प्रस्ताव नुकताच लोकसभेत मांडला. त्याला सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने मान्यता देऊन देशाचे दरवर्षी खर्च होणारे १७ कोटी रुपये वाचविले आहेत.

महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्येही राज्यातील आमदारांना सवलतीच्या दरात जेवण व इतर खाद्यपदार्थ दिले जातात. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा पडत आहेत. आमदार फार कमी वेळा विधानभवनाच्या कॅन्टिनमधल्या जेवणाचा स्वाद घेतात. त्यामुळे स्वस्तात जेवण देण्याचा आमदारांना फार काही फायदा होत नाही. उलट राज्य सरकारचे पैसे नाहक खर्च होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे. त्यामुळे शासनाची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होईल, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”    


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)– गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एक टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली.
खराळवाडी, पिंपरी येथे गाडी पार्क करण्याच्या कारणावरून भांडणे झाली. त्यातच एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्‍का लागला. या कारणावरून एका टोळक्‍याने धुडगूस घालत खराळवाडी परिसरातील दोन छोटा हत्ती टेम्पो आणि एका मोटारीची काच फोडत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच टोळक्‍याने धारदार शस्त्राचा वापर करी केलेल्या मारहाणीत काहीजण जखमीही झालेले आहेत
  • आरोपीवर कडक कारवाई करणार : pi बाबर
  • पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले, “आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू आहे. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.

वाहन तोडफोड घटनांना यावर घाला
गेल्या तीन वर्षापासून शहरात दर 15 दिवसांनी विविध ठिकाणी टोळक्‍यांकडून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडत असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. अशा घटना आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):चिंचवडमध्ये राहणाऱ्या कर्नाटक मधील कुटूंबातील घरगुतीवादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली
बानू हसन नदाफ (३५)असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे
हसन दस्तागिर नदाफ (41) असे खून केलेल्या पतीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार नदाफ कुटुंब कर्नाटकमधून दहा महिन्यापूर्वी चिंचवडला आले होते हसनाला दोन पत्नी आहे संशयावरून घरात नेहमी खटके उडत होते घरगुती वादातून हसनने बानूचा खून केल्याची घटना उघडकीसआली पुढील तपास चिंचवडचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे करीत आहे


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)

पत्नीला आय लव्ह यु चा संदेश पाठवला म्हणून स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. पुण्याच्या मारुंजीत बुधवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. 
विठ्ठल मानमोडे (वय 32) असं आरोपीचे तर निलेश नाईक (वय 24) असं प्रशिक्षकाचे नाव होते. निलेश पुण्यातील गोखलेनगर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण द्यायचा. निलेश सुसगाव येथील ज्या सोसायटीत राहतो तिथंच विठ्ठल ही राहायला असल्याने त्यांची मैत्री झाली होती. निलेशचं विठ्ठलच्या घरी येणं-जाणं व्हायचं. याच ओळखीतून विठ्ठलच्या पत्नीचा निलेशकडे नंबर ही आला होता. याच दरम्यान विठ्ठलवर चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो काही दिवस बाहेर अन काही दिवस घरी असायचा. अशातच एकट्या पडलेल्या विठ्ठलच्या पत्नीला निलेशने प्रेमाच्या जाळ्यात घेण्याचा इरादा केला आणि आय लव्ह यु चा मेसेज पाठवला. ही बाब विठ्ठलला समजली अन त्याने निलेशचा काटा काढण्याचं ठरवले. यासाठी मंगळवारी रात्री विठ्ठलने पार्टीचा बेत आखला. निलेश आणि एका साथीदाराला घेऊन तो मारुंजी येथील निर्जनस्थळी आला. तिथंच तिघे रात्रभर दारू प्यायले नशेत असतानाच सोबत आणलेल्या कोयत्याने साथीदाराच्या मदतीने विठ्ठल मानमोडेने निलेशचा गळा कापला. हिंजवडी पोलिसांनी विठ्ठलला नवी मुंबई येथून अटक केली, तर साथीदार अद्याप ही फरार आहे.


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
स्थायीची सभा प्रथा परंपरेने चालणार की कायद्याने हे सभापतींनी स्पष्ट करावे. जर कायद्याने चालवायची असेल तर स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. सभागृहात सभेच्या वेळी चित्रीकरण करा. महासभेसारखच स्थायीच्या सभागृहात नागरींका बसण्याची परवांनगी देवून पारदर्शक कारभार करा असे असे मत शिवसेनेचे स्थायीचे सदस्य राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. वाद वाढताच महापालिकेचे मृत्यूपावलेले कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.
स्थायी समितीची बुधवारी सभा झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सभेची सुरुवात वादातून झाली. सभा सुरु होण्यापूर्वी पूर्व बैठक झाली नसल्यांने सभेत वाद सुरु झाला.सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांना सभापतीने विश्वासात न घेता एकाधिकार शाहीने सभा चालवत असल्याचा आरोप राष्टवादीच्या नगरसेवकांनी केला. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. तर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. बुधवारी झालेल्या स्थायीच्या सभेत सदस्यांची पूर्व बैठक न घेता थेट सभा सभापतींनी सुरु आली. त्यावेळी शिवसनेचे स्थायीचे सभासद राहुल कलाटे यांनी थेट सभापती मडिगेरी यांना सभा ही प्रथा परंपरेने चालते की कायद्या प्रमाणे चालते असा प्रश्न विचारला. तर सभापतींनी कायद्या प्रमाणे चालते असे सांगितले.
सभा कायद्या प्रमाणे चालते तर टक्केवारी कशी मिळते. स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. सभेचे  चित्रीकरण करा. तुमचा पारदर्शक कारभार आहे तर जणते समोर येवू द्या असा सवाल राहुल कलाटे यांनी उपस्थित केला. त्यांना राष्ट्रवादीचे मयुर कलाटे, पंकज भालेकर यांनी साथ दिली. त्यावेळी सभापती मडिगेरी यांनी सभा माझ्या मनाप्रमाणे चालविणार असे सांगितले असता विरोधी पक्षाचे नगरसेवक भडकले. धमकी देताय का  असा आरोप विरोधी सदस्यांनी केला.
 सभा ही सदस्यांच्या मताप्रमाणे चालते. त्यासाठी कायदा आहे. असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगताच  दुसऱ्याचे ऐकून सभा चालवू नका असा टोला मयुर कलाटे यांनी सभापतींना लगावला.
यावर भाजपाचे स्थायी सदस्य शितल शिंदे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत आपण पूर्व बैठक घेवून काय निर्णय घ्यायचा आहे ते ठरवू ही सभा तहकूब करा असे सांगितले. त्यानंतर महापालिकेचे मृत्यूपावलेले कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात स्केटिंग शिक्षकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.
निलेश नाईक असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मारुंजी येथे मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मृतदेहाच्या जवळ बिअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे रात्री दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या १५००  महिला आहे या महिलांना गेल्या अनेक दिवसापासून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही  त्यांना आरोग्यविमा अशा कुठल्या सुविधा दिल्या जात नाही तसेच त्यांना समान वेतन किमान वेतन हे देखील दिले जात नाही आणि गेल्या तीन महिन्यापासून त्यांना पगार देखील देण्यात आलेले नाही 
या सर्व प्रश्नांवर आज कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकावरती मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले कष्टकरी कामगार पंचायतीचे  अध्यक्ष कष्टकऱ्यांची नेते बाबा कांबळे ,यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळीपंचायत कोषाध्यक्ष  प्रल्हाद कांबळे कार्यध्यक्ष बळीराम काकडे, दत्तात्रय शिंदेआदी उपस्थित  होते,
यावेळी BRSP,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष संजीवन कांबळे,  महेंद्र सरोदे ,रविकिरण बनसोडे ,राम बनसोडे,  यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला, आणि मार्गदर्शन केले,


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 96 टक्के पाणीसाठा असताना ही, शहरात पाणी कपात सुरु आहे. या विरोधात सोमवारी महापालिकेवर मनसे आणि काँग्रेसने मोर्चे धाडले. मनसेने महापौरांच्या गाडी समोर रिकामे मडके फोडले. तर काँग्रेसने हंडा मोर्चा काढला. शहरात दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात रद्द करा, अन्यथा पाणीपट्टी पन्नास टक्केच भरू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 बघ्यांचा आततायीपणा अग्निशमन दलाच्या जवनासह एका कामगाराच्या जीवावर बेतलाय. सुदैवाने दोन जवान अन दोन तरुणांना जीवदान मिळाले. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. तिथंच नागेश जमादार हा पंधरा फूट खड्ड्यात काम करत होता. तेंव्हा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अचानक त्याच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला, यात गळ्यापर्यंत तो गाडला गेला. नागेश मदतीची याचना करू लागला, हा आवाज शेजारीच खेळत असलेल्या ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे यांनी ऐकला. दोघांनी कशाची ही परवा न करता ते थेट खड्ड्यात उतरले. तिथल्याच टिकाव आणि खोऱ्याने बचावकार्य सुरू केलं. वाऱ्यासारखी ही बातमी परिसरात पसरली. अन बघ्यांची गर्दी वाढू लागली. बघता-बघता ईश्वर आणि सीताराम यांनी नागेशच्या कंबरेपर्यंतची माती बाजूला केली. तितक्यात सायंकाळी 6 वाजता अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी पोहचले. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव या तिन्ही जवानांनी बचावकार्य सुरू केलं. तिन्ही जवानांनी अगदी गुडघ्यापर्यंतची माती बाजूला केली. ठेकेदार एम बी पाटीलच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग नागेशवर ओढवला. पण आता अवघ्या पंधरा मिनिटांत बचावकार्य संपणार होतं. मात्र बघ्यांचा आततायीपणा वाढला अन त्या सर्वांच्या पायाने पुन्हा मातीचा ढिगारा या तिन्ही जवानांसह नागेशच्या अंगावर कोसळला अन सहा ही जण गाढले गेले. मग आणखी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ईश्वर आणि सीताराम वरच्याच बाजूला असल्याने त्यांना शिडीच्या साह्याने बाहेर आले. तसेच काहीवेळाने सरोज आणि निखिल या दोन्ही जवानांना जीवदान मिळालं पण दुर्दैवाने विशाल जाधव यात शहीद झाले. तर मध्यरात्री साडे तीन वाजता नागेशचा मृतदेह ndrf आणि लष्कराच्या तुकडीने बाहेर काढला. बघ्यांनी आणखी पंधरा मिनिटं कळ सोसली असती तर विशाल आणि नागेश आज आपल्यात असते. तेंव्हा अशी कोणतीही घटना घडल्यास बचावकार्यात तुम्ही अडथळा ठरणार नाही, याची काळजी घ्या.

शहीद विशाल जाधव माहिती*शहीद विशाल जाधव यांचा जन्म हा साताऱ्यातील फलटण येथे झाला. त्यांचे वडील हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे मुंबईतच झालं. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलात ते 26 डिसेंबर 2012 ला रुजू झाले. तेंव्हापासून ते इथेच कार्यरत असून, रहायला मोशी येथे आहेत. मोशीत ते पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलीसह राहत होते. आता त्यांचा अंत्यविधी हा मूळगावी होणार आहे.*

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget