पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर आज घडलेला प्रकार हलगर्जीपणामुळे घडला की तो नव्यानं सुरू करण्यात आलेल्या ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलचा भाग आहे. याची चौकशी होणे गरजेची आहे.
डेक्कन क्वीन आणि लोकल ट्रेन या अवघ्या काही मीटरवर येऊन थांबल्याचं प्रवाश्यांनी निदर्शनास आणले आहे. यामुळे दोन्ही रेल्वेतील प्रवाश्यांना मोठा धक्का बसला. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारलं असता त्यांनी हे हलगर्जीपणामुळे घडलं नसल्याचं सांगत, हा ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलचा भाग असल्याचे सांगितले नव्याने हे सिग्नल एक-एक किलोमीटरच्या अंतरावर बसवण्यात आलेत. यामुळे एकाच रेल्वे मार्गावर अनेक रेल्वे धावू आणि थांबू शकतात असं स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच हा भाग मुंबई रेल्वे विभागात येत असल्याने त्यांच्याकडून सविस्तर माहिती दिली जाईल.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.