नागरगावात आढळले बिबट्याचे ३ बछडे

 पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे  मंगळवार दि.१९ ला सायंकाळी उसतोडणीच्या वेळी कामगारांना बिबट्याची ३ पिल्ले पाहावयास मिळाली.शेतकरी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात ही ३ पिल्ले निदर्शनास आल्याने त्यांनी ताबडतोब ही माहिती शिरूर वनविभागास कळविली. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट बचाव केंद्रास यांना कळविले. माणिकडोह बिबट बचाव व निवारा केंद्राचे प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अजय देशमुख व त्यांच्या टीमने तातडीने आपल्या रेस्क्यू टीमसह नागरगाव येथे धाव घेत या छोट्या बिबट बचड्यांची पाहणी केली व त्यांना मोक्रोचिप लावली.
            डॉ.देशमुख व त्यांच्या टीमने या पिल्लांना तिथेच आई कडे सोपवण्याचा निर्णय घेतला.याकरिता त्याजागेवर कॅमेरा ट्रॅप लावून डॉ देशमुख यांच्या टीमने  500 मीटर अंतरावर थांबून निरीक्षण केले. सायंकाळी 6:30 ला मादी तिथे आली, 6:43 ला पाहिले पिल्लू नेले. 7:23 ला दुसरे व 7:53 ला तिसरे पिल्लू घेऊन गेली. रात्री 8 वाजेपर्यंत बिबट्याची तीनही पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत परत विसावली. यात एक नर व दोन मादी पिल्लू असल्याची माहिती डॉ.देशमुख यांनी दिली. पिल्लं परत केल्यामुळे आई चिडून हल्ले करत नाही व पिल्लांचे पुढील जीवन आई सोबत जात असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
73 बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत

विशेष म्हणजे माणिकडोह बिबट बचाव केंद्राने आतापर्यंत 73 बिबट पिल्लू आई च्या कुशीत दिली आहेत.
तर या कामी वनविभागाचे वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भानुदास शिंदे, वन विभागाची शिरूर रेस्क्यु टीम व सुधीर शितोळे, शरद गदादे,सुनील कळसकर,गोविंद शेलार व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget