November 2019मुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना बहुमत चाचणी सिध्द करावी लागली. बहुमत चाचणी सिध्द करत असताना ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबा दर्शवला.
ठाकरे सरकारला बहुमत चाचणीतून जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे मिळून झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमदारांसह काही अपक्ष आमदारांनी पठिंबा दर्शवल्यानंतर हा 169 चा आकडा पार करू शकले आहेत, त्यामुळे बहुमत चाचणीमध्ये यशस्वीरित्या पास झाल्यानंतर ठाकरे सरकरावर शिक्का मोर्तब झाला आहे.


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निर्णय दिला तो रायगड संवर्धन आणि परिसर विकासासाठी 20 कोटी रुपये निधी वितरणाचा.
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. श्री. ठाकरे यांनी रायगड किल्ल्याच्या विकासकामांची नस्ती मागवली. त्यांनी विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देवून त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा असून त्याचे जतन करणे व पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक असून राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करीलअसे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर आज घडलेला प्रकार हलगर्जीपणामुळे घडला की तो नव्यानं सुरू करण्या
त आलेल्या ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलचा भाग आहे. याची चौकशी होणे गरजेची आहे.
 डेक्कन क्वीन आणि लोकल ट्रेन या अवघ्या काही मीटरवर येऊन थांबल्याचं प्रवाश्यांनी निदर्शनास आणले आहे. यामुळे दोन्ही रेल्वेतील प्रवाश्यांना मोठा धक्का बसला. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारलं असता त्यांनी हे हलगर्जीपणामुळे घडलं नसल्याचं सांगत, हा ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलचा भाग असल्याचे सांगितले नव्याने हे सिग्नल एक-एक किलोमीटरच्या अंतरावर बसवण्यात आलेत. यामुळे एकाच रेल्वे मार्गावर अनेक रेल्वे धावू आणि थांबू शकतात असं स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच  हा भाग मुंबई रेल्वे विभागात येत असल्याने त्यांच्याकडून सविस्तर माहिती दिली जाईल.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले.

पिंपरी। (टाईम न्युजलाईन नेटवर्क): – विधानसभा चुनाव के बाद महाराष्ट्र में बने नए समीकरण के अनुसार भले ही शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस के महामोर्चा की सरकार स्थापना में अभी समय है, मगर उसका असर पूरे राज्य में अभी से दिखाई देने लगा है। पिंपरी चिंचवड़ मनपा में शुक्रवार को महापौर चुनाव में भी उक्त दलों की महाविकास आघाडी की झलक नज़र आई। इस चुनाव में शिवसेना के नगरसेवकों ने राष्ट्रवादी कांग्रेस के पलड़े में अपने वोट डालें। हालांकि चुनाव पर इसका कोई खास असर नहीं हुआ। जैसे उम्मीद थी सत्तादल भाजपा की उषा उर्फ माई ढोरे ने महापौर की कुर्सी पर कब्जा जमाया। उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस की स्वाति उर्फ माई काटे को 40 वोटों से हराया। और तुषार हिंगे को बिना किशी विरोध के उपमहापौर बने.पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवड महापौर पदी उषा उर्फ माई ढोरे यांची 81 मतांनी निवड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा 40 मतांनी पराभव. शिवसेनेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राज्यातील सत्तेआधीच महाविकासआघाडी पहायला मिळाली.
राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी माघार घेतल्याने तुषार हिंगे यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)– संपूर्ण से भी ज्यादा बहुमत हासिल रहने के बाद भी अब तक 50 बार सर्वसाधारण सभा स्थगित रखनेवाले पिंपरी चिंचवड़ मनपा के सत्तादल भाजपा ने बुधवार को मात्र 10 मिनट में दो सभाओं का कामकाज निपटाने का रिकॉर्ड बनाया है। शहरवासियों पर पानी की कटौती लादने का फैसला किया गया।
सभा मे बिना पढ़े ही उपसुझावों की वर्षा करते वक्त सभा में कोरम पूरा है या नहीं? यह देखने की भी जरूरत नहीं समझी। मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर की निष्क्रियता के चलते शहर में पानी की किल्लत बनी हुई है और उसे छिपाने के लिए सर्दी के मौसम में ही पानी कटौती लादी जा रही है। इस प्रकार की टिप्पणी करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, मनसे आदि विपक्षी दलों के नगरसेवकों ने एक दिन छोड़कर जलापूर्ति करने के फैसले का पुरजोर विरोध जताया। मगर सत्तादल की ‘दादा’गिरी के आगे उनका विरोध टिक न सका और दो माह के लिए शहरवासियों पर पानी की कटौती लादने का फैसला किया गया।

 पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे  मंगळवार दि.१९ ला सायंकाळी उसतोडणीच्या वेळी कामगारांना बिबट्याची ३ पिल्ले पाहावयास मिळाली.शेतकरी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात ही ३ पिल्ले निदर्शनास आल्याने त्यांनी ताबडतोब ही माहिती शिरूर वनविभागास कळविली. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट बचाव केंद्रास यांना कळविले. माणिकडोह बिबट बचाव व निवारा केंद्राचे प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अजय देशमुख व त्यांच्या टीमने तातडीने आपल्या रेस्क्यू टीमसह नागरगाव येथे धाव घेत या छोट्या बिबट बचड्यांची पाहणी केली व त्यांना मोक्रोचिप लावली.
            डॉ.देशमुख व त्यांच्या टीमने या पिल्लांना तिथेच आई कडे सोपवण्याचा निर्णय घेतला.याकरिता त्याजागेवर कॅमेरा ट्रॅप लावून डॉ देशमुख यांच्या टीमने  500 मीटर अंतरावर थांबून निरीक्षण केले. सायंकाळी 6:30 ला मादी तिथे आली, 6:43 ला पाहिले पिल्लू नेले. 7:23 ला दुसरे व 7:53 ला तिसरे पिल्लू घेऊन गेली. रात्री 8 वाजेपर्यंत बिबट्याची तीनही पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत परत विसावली. यात एक नर व दोन मादी पिल्लू असल्याची माहिती डॉ.देशमुख यांनी दिली. पिल्लं परत केल्यामुळे आई चिडून हल्ले करत नाही व पिल्लांचे पुढील जीवन आई सोबत जात असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
73 बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत

विशेष म्हणजे माणिकडोह बिबट बचाव केंद्राने आतापर्यंत 73 बिबट पिल्लू आई च्या कुशीत दिली आहेत.
तर या कामी वनविभागाचे वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भानुदास शिंदे, वन विभागाची शिरूर रेस्क्यु टीम व सुधीर शितोळे, शरद गदादे,सुनील कळसकर,गोविंद शेलार व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): - पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका उचलत असलेल्या 520 एमएलडीपैकी 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. यापूर्वी देखील गळती होत होती. पण, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळे आता गळतीचे प्रमाण वाढले आहे. टँकरवाले पाणी पुरवू शकतात. तर, महापालिका पुरेसे पाणीपुरवठा का करु शकत नाही? असा सवाल करत अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. अधिकारी  ठेकेदार, कामात भागीदार झाले आहेत. टँकर लॉबी बंद करावी. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्या संदर्भात खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, चिंचवड महिला आघाडीच्या संघटिका अनिता तुतारे यांचा समावेश होता. 

 खासदार बारणे म्हणाले, शहराला पुरेसे आणि समान पाणीपुरवठा होत नाही. तोपर्यंत महापालिकेने अल्प दरात टँकरने पाणीपुरवठा करावा. विहिरी, बोअरवेल हे पाण्याचे स्त्रोत ताब्यात घ्यावेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. संपुर्ण शहराला समान पाणीपुरवठा करण्यात यावा. 

महापालिका प्रशासन पाणी गळती, चोरी रोखू शकले नाही. पाणी चोरी शोधण्याचे काम कोणाचे आहे. महापालिका कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहे. अनधिकृत नळजोड एका दिवसात झाले नाहीत. ते रोखण्याचे काम प्रशासनाचे होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. जेएनयूआरएन, अमृत योजनेअंतर्गत सातत्याने पाण्याचे मीटर बदलले. परंतु, पाणीगळती रोखू शकले नाहीत.  ठेकेदार पोसण्यासाठीच हे केले जात आहे का? याचा संशय येत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यात प्रशासन निष्क्रिय ठरले आहे. आयुक्तांचा वचक राहिल नाही. तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे.  आजपर्यंतच्या पाणीपुरवठ्याच्या निविदांची चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. 

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget