मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडचा राहुल कलाटे यांना पाठिंबा


विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
वाढत्या पाठिंब्यामुळे कलाटेंचे पारडे जड
पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने आज (सोमवारी) पाठिंबा देण्यात आला. तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड, नागरी हक्क सुरक्षा समितीचेही पाठबळ मिळाल्याने कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून सर्वपक्षीयांचे उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. मतदार संघातील उच्चशिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पदयात्रा, रॅलींना होणारी गर्दी, मतदार संघातील सोसायट्यांकडून मिळालेला पाठिंबा यामुळे कलाटे यांनी चर्चेचा नूर पालटून टाकला आहे. कलाटे यांची मतदार संघातील वाढती ‘क्रेझ’ तसेच सुशिक्षित व सर्वमान्य उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कलाटे यांना पुरस्कृत केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि मनसेने देखील कलाटे यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली. सर्वपक्षीय कलाटे यांच्या मागे एकवटल्याचे चित्र असतानाच सामाजिक संघटनांकडूनही त्यांना पाठिंब्याचा ओघ वाढला झाला आहे.
मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव विशाल जरे, जिल्हा संघटक लघु लांडगे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर संघटक रशिदभाई सय्यद, विनोद घोडके, वैभव जाधव यांनी राहुल कलाटे यांना पत्राद्वारे बिनशर्त पाठिंबा दिला.
शास्तीकर, रिंग रोड, अनधिकृत बांधकाम हे प्रश्न सोडवतो असे सांगून सत्तेत आलेल्या विद्यमान आमदारांनी यातील एकही प्रश्न आजपर्यंत सोडविला नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले भाजप सरकार मराठा बहुजन समाजाचे शोषण करीत आहे. मोदी, फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी अनेक पटीने वाढली आहे. फसव्या कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्‍यांचा आवाज दाबला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात, शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधु असे आश्वासन देणार्‍या या सरकारने स्मारकाची एकही विट रचली नाही. मात्र, काम सुरु होण्यापूर्वीच 80 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत. इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन करून तिथेही एक विट देखील रचली गेलेली नाही. तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, रस्त्याची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, आर्थिक मंदी याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असून याविरोधात राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडने नमूद केले आहे.
प्रचाराचा धडाका

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहूल कलाटे यांनी आज सोमवारीही जोरदार प्रचार केला. विविध सोसायट्यांमध्ये बैठका, कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत चिंचवडच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. दिवसेंदिवस कलाटे यांच्या प्रचारास जोरात पाठींबा मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget