पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
काँग्रेस मुक्त देश,राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र असे घोषणा भाजपने केली होती ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक्षात आणली. आघाडीने जातीपातीचे राजकारण केले. घराणेशाहीला प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी थेरगाव येथे केला
थेरगाव येथे भाजपा उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सभा झाली त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे,अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप महापौर राहुल जाधव, एकनाथ पवार,
सदाशिव खाडे,उपस्थित होतेे
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की,
कांग्रेस मुक्त देश,राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र असे घोषणा भाजपने केली होती ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक्षात आणली. आघाडीने जातीपातीचे राजकारण केले. घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आहे.
परळी विधानसभेची उगाच काहीही चर्चा सुरु आहे, जशी बीड लोकसभेची होती. झालं काय हे पाहिलं. पिंपरी चिंचवड हे अमेरिका आहे. जागतिक पातळीवर नाव आहे. त्यामुळे भाजपने पिंपरी चिंचवड नाव स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट केले
राष्ट्रवादीच्या घडाळ्यात 10 वाजून 10 मिनिटे असतात, हे घड्याळ 24 ऑक्टोबर ला कायमचे बंद करायचं. हेच एकमेव ध्येय आमचे आहे
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.