बाळासाहेब नेवाळे यांचा दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम :दोन दिवसांत पुढील निर्णय:सुनील शेळके यांना बसणार फटका


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):राष्ट्रवादी कांग्रेसकडून अनेक पदे भूषविणारे बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून राष्ट्रवादीला रामराम ठोकला.  राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा म्हणून बाळासाहेब नेवाळे यांची ओळख आहे. मागील पंधरा वर्षापासून ते विधानसभेची उमेदवारी मागत असताना त्यांना कायम डावलण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली. यावेळी ते उमेदवारी करिता तीव्र इच्छूक असताना देखील त्यांना डावलत ऐनवेळी भाजपात बंडखोरी करुन बाहेर पडलेले सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नेवाळे नाराज झाले होते.
नेवाळे यांना मानणारा मोठा वर्ग मावळच्या ग्रामीण भागात आहे. या सर्व समर्थकांशी चर्चा करत आज नेवाळे यांनी आज वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्समध्ये मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसात पुढील राजकिय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे यावेळी नेवाळे यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget