पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळीने राष्ट्रवादी कॉग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असताना, राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आहे. या गटाची मावळमध्ये बैठक झाली असून राष्ट्रवादीच्या सभासद व पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमधून बापू भेगडे व बाळासाहेब नेवाळे हे दोघे प्रमुख दावेदार होते. मात्र, ऐनवेळी तळेगाव नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक सुनील शेळके यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आहे. दसरा झाल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सभासद पदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे मावळ तालुक्यात दसऱ्यानंरत राजकीय भुकंप होण्याची चिन्ह आहे.
मावळमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सर्वच निवडणुकीत गटातटाचे राजकारण होत असल्यामुळ याचा फायदा नेहमी भाजपाला झाला. आहे. यामुळे रुपलेखा ढोरे, दिंगांबर भेगडे(दोन वेळा), बाळा भेगडे (दोन वेळा) यांना सहज आमदार होता आले. भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांची हॅट्रीक रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाचे नाराज झालेले नगरसेवक सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा मावळमध्ये फडकला जाणार असे बोलले जात असतानाच उमेदवारी न मिळालेला एक गट नाराज होऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. या नाराज गटाला थांबविण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न होणार की फुट पडणार हे दसरा झाल्यानंतरच समजणार आहे. याच नाराज गटाला भाजपा उमेदवार बाळा भेगडे आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्नशिल राहतील. या सर्व डावपेचानंतर जो उमेदवार आघाडी घेईल तोच मावळचा यंदाचा आमदार होईल.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.