पिंपळे गुरव, सांगवीकरांचा परिवर्तनाचा निर्धार सांगवीत राहुल कलाटे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवक राहुल कलाटेंच्या प्रचारात


पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) - सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. मागील पंधरा वर्षांत दुसर्‍या पक्षाच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय इतरांनी लाटू नये असे आवाहन करताना यंदा चिंचवड विधानसभेत परिवर्तन करण्याचा निर्धार पिंपळे गुरव, सांगवीतील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय उमेदवार उमेदवार राहूल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित या रॅलीत राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याच्या घोषणा देण्यात आल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, मनसे, विविध संघटना, वंचित बहुजन आघाडीसस अनेक पक्ष, आजी माजी पदाधिकारी एकवटल्याचे चित्र दिसले. सांगवी, पिंपळेगुरव परिसरात काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे हा संपूर्ण परिसर कलाटेमय झाल्याचे पहावयास मिळाले. रॅलीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, तानाजी जवळकर, सुनिल ढोरे, अमर अदित्य, शिवाजी पाटोळे, बाळासाहेब पिलेवाट, सुरेश सकट, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश ढोरे, पंकज कांबळे, निखील चव्हाण, अमरसिंह आदियाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
नागरिकांशी संवाद साधताना नगरसेवक नवनाथ जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसराचा कायापालट झाला. राजमाता जिजाऊ उद्यान, निळू फुले नाट्यगृह, संत सावता माळी उद्यान, बॅडमिंटन हॉल, पाण्याच्या टाक्या, शिवसृष्टी उद्यान, सांगवी फाटा येथील सब-वे, डी. पी. तील रस्त्यांचे जाळे आदी सुविधांसह मुलभूत सेवा देण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा चिंचवड मतदार संघ बनविण्यासाठी राहुल कलाटे यांच्या पाठिशी असल्याचे नवनाथ जगताप यांनी सांगितले.
माजी नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले की, शहराचे राजकारण ढवळून टाकणारे नेते, कारभारी या प्रभागाचे आमदार म्हणून नेतृत्व करीत आहेत. मात्र, या भागासह शहरातील अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत गेल्या नऊ-दहा वर्षांपासून राजकारण करीत आहेत. 2004 ते 2014 या काळात कोणाच्या सहकार्याने विकास कामे केली, मागील 15 वर्षांत विधान परिषद आणि विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले, शंभर टक्के शास्ती कर माफी का झाली नाही, नवी सांगवीत मोफत पाणी मीटर बसविले असताना  पिंपळे गुरवच्या नागरिकांना पाणी मीटर विकत घ्यावे लागले यामागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल शितोळे यांनी केला.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, पिंपळे गुरवमधील जिजाऊ उद्यानाला दुबईच्या धर्तीवर मिरॅकल गार्डन म्हणून विकसित करण्याची घोषणा करीत उद्यान बंद करण्यात आले. आजही उद्यानाचे काम अर्धवट आहे. उद्यान बंद असताना आचारसंहितेच्या तोंडावर उद्घाटनाचा देखावा केला गेला. चिंचवड विधानसभा मतदार संघात एकही नवा प्रकल्प आणला नाही, आता तर कचला संकलन शुल्काच्या नावाखाली नागरिकांवर दरमहा खर्चाचा भार लादण्यात आला आहे. सुस्थितीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले. विशेष म्हणजे त्यासाठी सल्लागार नेमून त्यावर खर्चाची उधळपट्टी केली. महापालिकेच्या जीवावर भाचे, नातेवाईक गब्बर झाले पाहिजेत, हाच कारभार मागील पाच वर्षात केल्याचा आरोप राजेंद्र जगताप यांनी केला.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget