पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी विजयश्री खेचून आणली तर पिंपरीत शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना धोबी पछाड देत राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे यांनी विजयी मिळविला. पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसने पिंपरीत बालेकिल्ला शाबूत ठेवला. तर चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी जोरदार टक्कर दिली. परंतु, भाजपाने आपला गड राखत जगताप यांनी हॅट्रीक केली.
चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला माणला जातो. या बालेकिल्यात भाजपाचे तगडे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी विकासाच्या जोरावर निवडणुक लढविली. चिंचवड मतदार संघात केलेला विकास हाच निवडणुकीत मुख्यमुद्दा होता. त्यांना शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी जोरदार टक्कर देत विजयासाठी झुंजवत ठेवले होते. कलाटे यांना महाआघाडी व मनसेसह वंचित आघाडीने पाठीबा दिला होता. परंतु, त्याचा जास्त काही फायदा झाला नाही. एकेकाळी लक्ष्मण जगताप यांचे नेतृत्वाखाली राहाणारे सर्वच कार्यकर्ते एकत्र येवून जगताप यांना टक्कर देण्याचा चंग बांधला होता. परंतु, त्याला यश आले नाही. अखेर जगताप यांनी अनुभवाच्या व राजकीय चाली खेळून निवडणुकीत विजयी मिळविला.
पिंपरीत राष्ट्रवादीचे नगरसेवक आण्णा बनसोडे यांना शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी झुंजवत ठेवले होते.राष्ट्रवादीचे बनसोडे यांनी निवडणुकीत चंग बांधला की अभी नही तो कभी नही असे नियोजन करून निवडणुकीत उतरले होते. झोपडपट्टीमध्ये जनसंपर्क वाढून मतदान आपल्या पदरात पाडले होते. मात्र,पिंपरी मतदानाचा टक्का घसरला होता. त्याचा फायदा आण्णा बनसोडे यांना झाला. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आघाडी न घेतल्यामुळे आण्णा बनसोडे हे सहज विजयी झाले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.