तळेगाव (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की,पुरुषवर्ग घरात पैसे आले की, कधी व्यवसने करतात तर महिलांच्या हातात पैसा आलेला थेट घरी जातात. मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर घरावर पैसे खर्च करतात. अशी टिपन्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तळेगाव येथे केली. थेट मुख्यमंत्री फडणविस यांनी पुरुषांनी अवहेलना केली.
तळेगाव दाभाडे येथे भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, सुर्यकांत वाघमारे,बाळासाहेब नेवाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणविस पुढे म्हणाले की, बाळा भेगडे यांना २८ हजार मतांनी विजयी झाले होते. तेव्हा ते राज्यमंत्री झाले आता ५६ हजारांनी विजयी करा त्यांना कॅबीनेटमंत्री करणार आहे.असे ही अश्वासन मुख्यमंत्री फडणविस यांनी दिले.
भाजपा सरकारने बचत गटाची मोठी चळवळ सुरु केली. या मध्यमातुन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व्यवसायाचे प्रशिक्षणही दिले जाणार असून उद्योगासाठी मार्केटींग उपलब्ध करून देणार आहे. बचत गटांना एक लाख रुपये बिन व्याजी कर्ज देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की,पुरुषवर्ग घरात पैसे आले की, कधी व्यवसने करतात तर महिलांच्या हातात पैसा आलेला थेट घरी जातात. मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर घरावर पैसे खर्च करतात.असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुरुषांची अवहेलना केली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.