पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज सायंकाळी शाहूनगर-संभाजीनगर भागात पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या.
सायंकाळी चार वाजता संभाजीनगर येथील दत्त मंदिरामध्ये जाऊन आमदार चाबुकस्वार यांनी हार घालून प्रचाराला सुरूवात केली.
संभाजीनगर, रोटरी क्लब, साई गार्डन, सम्राट सोसायटी, कस्तुरी मार्केट, मॉरीस सोसायटी, अभिमान सोसायटी, पोटे कॉर्नर, सुबोध विद्यालय, सर्पोद्यान, कल्पतरू अपार्टमेंट, रत्नसिंधू सोसायटी, OPO हत्ती गार्डन, सिद्धीविनायक मंदिर, यश प्लाझा, शिवशंभो फाऊंडेशन कॉर्न अशा मार्गे पदयात्रा पुढं सरकत एचडीएफसी कॉलनी येथे समारोप करण्यात आला.
सुमारे अडीच तास सुरू असलेल्या या पदयात्रेत नागरिकांनी ठिकठिकाणी आमदारांचे स्वागत करून तर महिलांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले. यावेळी आमदारांसमवेत शहर प्रमुख योगेश बाबर, संघटिका उर्मिला काळभोर, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक तुषर हिंगे, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, भाजपचे पिंपरी विधानसभा संयोजक राजु दुर्गे, मधुकर बाबर, ज्ञानेश्वर शिंदे, रोमी संधू, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, गोरख नवघणे, वैभव माने, प्रदिप साळुंखे, जितेंद्र वडुरकर, वैशाली माने, दिलीप सावंत, चंद्रकांत करडक, नारायण माने, दिलीप जाधव, संजय तोडकर आदी महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होत.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.