पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसची उमेदवारी ऐनवेळी सुनील शेळके यांना देण्यात आली.त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसमधून इच्छूक असलेले बाळासाहेब नेवाळे हे नाराज झाले. त्यांनी कामसेत येथे कार्यकर्त्यांचा बैठक घेऊन खदखद व्यक्त केली. या निवडणुकीत तटस्थ की राष्ट्रवादी कॉग्रेसमधून समर्थकांसह बाहेर पडण्याची भूमिका घेणार हे ९ ऑक्टोंबरला जाहिर होणार आहे. काही केले तरी नेवाळे यांची भूमिकेची शेळके यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मावळ विधानसभेत राजकीय उलथापालत सुरु झाली आहे. सुनील शेळके हे भाजपामधून इच्छूक होते. परंतु,ऐनवेळी भाजपाने शेळके यांची उमेदवारी नाकारली. व राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिली. या कारणावरुन त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवारी घेतली. राष्ट्रवादी कॉग्रेसमधून तिव्र इच्छूक असलेले बाळासाहेब नेवाळे हे नाराज झाले. त्यांनी कामशेत येथे विश्वासातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली.भाजपामध्ये दोनगट पडले होते. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता व नेवाळे यांच्या रुपाने ग्रामीण भागाला न्याय मिळाला असता. वडगाव व तळेगाव ही सध्या तालुक्याची सत्ता केंद्र झाली आहे. तर या निवडणुकीत ग्रामिण भागाला संधी देवून अन्याय दुर केला असता पण तसे काही झाले नाही. उलटसरशी भाजपाच्या इच्छूक उमेदवारांला राष्ट्रवादीची उमेदवारी देवून स्वपक्षियांतील इच्छूक व कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी नाराज केले असल्याचा आरोप ही नेवाळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.
नेवाळे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय माणले जातात. दसरा झाला की दुसऱ्या दिवशी नेवाळे हे भूमिका घेणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते तटस्थ राहाणार की राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार हे समजणार आहे. तटस्थ राहिले किंवा बाहेर पडले तरी शेळके यांना ती डोकेदुखी ठरणार आहे. ऐकीकडे भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रवी भेगडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेवून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पाठींबा जाहिर केला. त्यामुळे सुनील शेळके यांना धक्काच बसला आहे. त्यात स्वपक्षीयांकडूनच अडवाअडव झाली तर ती डोकेदुखी ठरणार आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.