दिघीकर पुन्हा विकासाशी नाळ जोडणार, – माजी नगरसेवक चंद्रकांत वाळकेपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क)– भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी डोंगराएवढी विकासकामे केली आहेत. लांडे हे दहा वर्षे आमदार असतानाच मतदारसंघात सर्वाधिक विकास झाला आहे. दिघी परिसरातील रस्ते आणि इतर नागरी सुविधा या माजी आमदार लांडे यांच्या पाठपुराव्यामुळेच येथील नागरिकांना उपलब्ध झाल्या आहेत. आज कोणी कितीही बढाया मारत असले, तरी दिघी आणि परिसरातील नागरिक विलास लांडे यांनी या भागातील विकासासाठी दिलेले योगदान विसरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत  विलास लांडे यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी गुरूवारी (दि. १०) व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी गुरूवारी संपूर्ण दिवसभर दिघी परिसरात पदयात्रा काढून ग्रामस्थ व नागरिकांशी संवाद साधला. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा रात्री साडेसात वाजता संपली. सकाळी गावातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. त्यामध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संजय धुमाळ, वसंत इंगळे, ज्ञानेश्वर आल्हाट, सचिन डुवळे, राजेंद्र ढवळे, संतोष बबन वाळके, प्रभाकर कदम, हरिभाऊ लबडे, सुधाकर भोसले, अरविंद हेलपल्ले, विलास पाटील, तानाजी देशमुख, लक्ष्मण पाटील, राजेंद्र वाळके, संदिप वाळके, शशिकांत वाळके, सुर्यकांत वाळके, पुंडलिक सैंदाणे, गोपीनाथ रोमन, सुरेंद्रसिंग अहिर, विलास भोसले सर, रमेश जमदाडे, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके म्हणाले, “माजी आमदार विलास लांडे यांची दिघीकरांसोबत असलेली विकासकामांची नाळ पाच वर्षांपूर्वी तुटली. ती आमची चूक ठरली आहे. पाच वर्षांचा विरोधकांचा काळ अनुभवल्यानंतर दिघीकरांना आता पश्चात्ताप होत आहे. या भागातील नागरिकांवर विकासाच्या नावाखाली केवळ भुलथापा ऐकण्याची वेळ आली आहे. विरोधक कामे न करता काम केल्याचे सांगून कसे फसवतात याचा दिघीकरांना चांगलाच अनुभव आला आहे. आता दिघीकरांना आपली नाळ पुन्हा विकासासोबत जोडण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. या भागाचा विकास करण्याची धमक फक्त विलास लांडे यांच्यामध्येच 
असल्याचे वाळके यांनी सांगितले.”

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget