पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : केवळ निवडणूक आली म्हणून मी काम करत नाही, मी सतत पाच वर्षे लोकांच्या संपर्कात आहे. भाजप, शिवसेना महायुतीची उमेदवारी मला मिळाली याचा सार्थ अभिमान आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते यांच्या जोरावर व जनतेच्या आशिर्वादावर मी पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी होईन, असा विश्वास भोसरी मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार आ. महेश लांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भाजप प्रदेश महिला आघाडीच्या नेत्या उमा खापरे, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, भाजप प्रदेश सदस्य राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लांडगे यांना आपल्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूकीला उभा दिसत नाही असे विचारले असता ते म्हणाले की, मला त्याबाबत कल्पना नाही. मी माझ्या पक्षापूरता बोलतो. मी महायुतीचा उमेदवार आहे, आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते यांच्या जोरावर व जनतेच्या आशिर्वादावर मी पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी होईन असा विश्वास असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी आपण काय व्यूहरचना केली आहे, असे विचारले असता. आमदार लांडगे म्हणाले की, केवळ निवडणूक आली म्हणून मी काम करत नाही, मी सतत पाच वर्षे लोकांच्या संपर्कात आहे. सन 2014च्या निवडणुकीत मी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांच्या बळावर अपक्ष म्हणून विजयी झालो. पुढे भाजपचे संलग्न सदस्यपद स्वीकारले. पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न मी केला आहे. आज भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीने मला उमेदवारी दिली, याचा सार्थ अभिमान आहे. आपण मागील वेळेपेक्षा या वेळी प्रचंड मताधिक्याने विजयी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्ज भरण्याआधी आमदार महेश लांडगे यांनी प्रचंड रॅली व पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन केले
. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत भाजप, शिवसेनेचे नेते, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.