पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज लांडेवाडी झोपडपट्टी व फुलेनगर परिसर पिंजून काढला.
आज सकाळी साडेदहा वाजता उमेदवार व आमदार ॲड. चाबुकस्वार यांचे लांडेवाडी येथे आगमन झाले. भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे, युवा सेना प्रमुख जितेंद्र ननावरे, युवा सेना शहरप्रमुख अभिजीत गोफण, स्वप्निल रोकडे, विभागप्रमुख अनिल पारचा, हाजी दस्तगीर, गणेश आहेर, रिपब्लिकन पक्षाचे बाळासाहेब भागवत, यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपथित होते.
भगवे झेंडे, भगवे उपरणे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे सर्व उपरणे गळ्यात घालून कार्यकर्त्यांचा जथ्था लांडेवाडी येथे पोहोचून प्रचाराला सुरूवात झाली. घरोघरी पत्रके वाटत कार्यकर्ते पुढे जात होते. त्यापाठोपाठ महायुतीचे उमेदवार ॲड. चाबुकस्वार भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकांना हात जोडत अभिवादन करत पुढे जात होते. लांडेवाडी भाग संपूर्ण पालथा घातल्यानंतर महात्मा फुले नगर येथे सर्वजण जमा झाले. या भागातील सर्व नागरिकांना भेटून घरोघरी जात आमदारांनी आशिर्वाद मागितले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.