मावळमध्ये बंडखोरी टाळण्यासाठीच भाजपाची खेळी ? : भेगडे की शेळके अद्यापही नाव निश्चित नाही


वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने तूर्त रोखली आहे. भाजपचे तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील शेळके यांनी कोणत्याही परिस्थितीत मावळ विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने पक्षातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजप नेत्यांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
भाजपचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या मावळ विधानसभेतून २००९ आणि २०१४ मध्ये भेगडे निवडून आले. यंदा तिसऱ्यांदा ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. भाजप उमेदवारांची पहिली यादी  मंगळवारी जाहीर झाली. मात्र, भेगडे यांचे नाव या यादीत आले नाही. त्यामुळे भेगडे समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
मावळ विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने नगरसेवक शेळके आग्रही आहेत. त्यादृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून ते तयारी करत आहेत. गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून त्यांचा गावोगावी संपर्क आणि प्रचार सुरू आहे. त्यांच्या झंझावती प्रचारामुळे भेगडे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शेळके यांनी तूर्त थांबावे आणि भेगडे यांना आणखी एक संधी द्यावी, यादृष्टीने भाजपमध्ये प्रयत्न झाले. मात्र, शेळके यांनी नकार दर्शवला आहे. त्यामुळे बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास पक्षाच्या विरोधात जाऊन शेळके पुढील निर्णय घेतील आणि विरोधकांचा फायदा होईल, अशी धास्ती भाजप नेत्यांना आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget