बच्चन हे महान कलाकार असण्याबरोबरच चांगला माणूस म्हणून अनुकरणीय: सुर्वे

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

‘बस नाम ही काफी है’ असं व्यक्तिमत्व असलेले अमिताभ बच्चन हे महान कलाकार असण्याबरोबरच चांगला माणूस म्हणून अनुकरणीय आहेत अशी भावना शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे यांनी आज येथे व्यक्त केली.
     अमिताभ बच्चन यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त येथील अंशुल क्रिएशनच्या वतीने अक्षरमुद्रणातून रेखाटलेल्या अमिताभ यांच्या ७७ छायाचित्रांचे भारतातील पहिले प्रदर्शन चिंचवडच्या रामकृष्ण मोरे कलादालनात सुरू झाले. शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे, किर्तीचक्र विजेते सुभेदार संतोष राळे, राष्ट्रीय सैनिक संस्था अध्यक्ष प्रताप भोसले, वुमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा निता परदेशी, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर अध्यक्षा संगीता निकम, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे, पोलीस फ्रेन्डस वेल्फेअरचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, मदन जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
     अमिताभ यांच्या ७७ वाढदिवसानिमित्त ७७ चित्रे अक्षरमुद्रणातून तयार केली असून ही ७७ नावे त्यांच्या चित्रपटांची आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग भारतात चिंचवड येथील श्रृती गणेश गावडे या तरूणीने केला आहे.
     अंशुल क्रिएशन्सचे विजय जगताप यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget