भोसरी मतदारसंघातील जनता विलास लांडेंच्या पाठीशी– उत्तम आल्हाटपिंपरी, दि. ११ (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – विरोधकांनी कितीही दहशत माजवली तरी भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आता डोळे उघडले आहेत. जागी झालेली ही जनता आता माजी आमदार विलास लांडे यांनाच निवडून देईल. मोशी आणि डुडुळगावांतील सर्व जनता विलास लांडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उत्तम आल्हाट यांनी व्यक्त केला. 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी शुक्रवारी (दि. ११) डुडुळगाव आणि मोशी परिसरात पदयात्रेद्वारे प्रचार केला. सकाळी नऊ वाजता डुडुळगाव गावठाणातील नाथ मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी पदयात्रेला सुरूवात केली. धायकवस्ती, सस्तेवाडी, आल्हाटवाडी, लक्ष्मीनगर उत्तर आणि दक्षिण, मोशी गावठाण, शिवाजीवाडी, गायकवाडवस्ती, इंद्रायणी पार्क, नागेश्वरनगर, देहू रस्ता, बारणेवस्ती, वाघेश्वर कॉलनी, बोराडेवाडी, सावतामाळीनगर, विनायकनगर, जुना जकात नाका, हजारेवस्ती, बाराटेवस्ती, बनकरवस्ती, पुणे-नाशिक रोड पश्चिम-पूर्व, आदर्शनगर, खान्देशनगर आणि तापकीरनगर येथे प्रचार पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

लांडे यांनी घरोघरी जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. दहा वर्षे आमदार असताना केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडला. आपल्या राजकीय जीवनाच्या कालावधीत केलेली विकासकामे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काही भागात उद्याने, उत्तम पद्धतीच्या विविध मुलभूत सुविधा देण्याचे काम केले. मात्र मतदारसंघातील विकासकामांच्या वेगाला गेल्या पाच वर्षांत ब्रेक लागला आहे. 

ठिकठिकाणी नागरिकांनीही विलास लांडे यांच्याशी संवाद साधत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला.
तसेच लांडे यांच्या पदयात्रेतही सहभाग नोंदविला. या पदयात्रेत नगरसेविका मंदा आल्हाट, हरिभाऊ सस्ते, विठ्ठल कामठे, गजानन गायकवाड, उत्तम आल्हाट, गणेश कुदळे, पप्पू बनकर, अनिल कुदळे, प्रवीण कुदळे, गणेश सस्ते, हिरामण सस्ते, नितीन सस्ते, प्रकाश आल्हाट, रामदास गायकवाड, अनिल आल्हाट, संतोष ढोकले, माणिक आल्हाट तसेच मोशी आणि डुडुळगावाचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget