भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबविणे गरजेचे -अजित पवार

पिंपरी-चिंचवड (टाईमन्युजलाईन नेटवर्क) – भोसरी मतदारसंघात भ्रष्टाचार वाढला आहे.गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून महिला-मुलींही सुरक्षित नाहीत. पोलीस आयुक्तालय होऊनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. पिंपरी-चिंचवड आणि भोसरीच्या विकासाठी आम्ही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने, डब्बू आसवानी, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक योगेश बहल, वैशाली काळभोर, शेखर ओव्हाळ, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, पिंपरी, चिंचवड भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबविणे गरजेचे
असून गुन्हेगारी रोखणे काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीतर्फे चिंचवडमधून राहूल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहे. तर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget