तळेगाव (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
- कार्ला येथील महालक्ष्मी सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस शेळके यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
रविवारी नाणे मावळात सुनिल शेळके यांचा प्रचारदौरा मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. कार्ला येथील महालक्ष्मी मित्र मंडळाचे अध्यक्ष बबनराव इंगवले यांनी सुनिल अण्णा यांना मंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र दिले. मावळ तालुक्याचा विकास केवळ सुनिल शेळके यांच्यासारखा तळमळीने काम करणारा नेताच करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे आमचा सक्रीय पाठिंबा सुनिल अण्णांना आहे , असे या पत्रात नमूद केले आहे.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष किसन हुलावळे, खजिनदार हरिभाऊ जमदाडे, सेक्रेटरी अशोक चव्हाण, सदस्य जयवंत केदारी, लक्ष्मण जंगम, राहुल पडवळ, बाळू जंगम, बंटी मोरे, अमोल सुतार, संतोष हुलावळे, विष्णू हुलावळे, बबन हुलावळे, पडवळ मामा, धोंडिबा मोरे आदी उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.