पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास काही मिनिटेच शिल्लक होती. अजित पवार इंदापुरात भाषण करत होते. विलास लांडे यांचा फोन आल्याचे अजित पवारांना चिठ्ठी देऊन सांगण्यात आले. तेव्हा वैतागलेल्या स्वरात भाषणातच पवार म्हणाले की, विलास लांडेला सांगा, तुला करायचे ते कर. सारखे फोन करू नकोस. आता म्हणतो की, पक्षाचा अर्ज भरू का. इतके दिवस कोणी अडवले होते का.
भोसरीत भाजपकडून आमदार महेश लांडगे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात तितकाच सक्षम उमेदवार देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. भोसरीत अपक्ष आमदार निवडून येण्याची परंपरा असल्याचे सांगत विलास लांडे यांनी यंदा अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे पक्षश्रेष्ठींना कळवले होते. अनेक वर्षांपासून आमदारकीच्या तयारीत असलेले नगरसेवक दत्ता साने यंदा राष्ट्रवादीकडून तीव्र इच्छुक होते.
त्यांनीही उमेदवारी स्वीकारली नाही. बराच काळ उमेदवारीचा घोळ सुरू होता. अपेक्षित ताकतीचा उमेदवार न मिळाल्याने राष्ट्रवादीने कोणालाही रिंगणात उतरवले नाही. लांडे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.