पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करणाऱ्या मावळ तालुक्यातील बाळासाहेब नेवाळे यांचा समाचार घेताना 'बाळा, हे वागणं बरं नव्ह ' अशा शेलक्या भाषेत पवारांनी त्यांच्यावर टीका केली. तुम्हाला भरपूर मिळाले आहे, आता तालुक्याच्या हितासाठी मन मोठं करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
मावळ
विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी तळेगाव येथे शरद पवारांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,या सरकारच्या काळात जेट एयरवेज बंद पडल्यामुळे २० हजार लोकांचा रोजगार गेला.महिलांना, कष्टकर्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्याच जमिनीवर उभारलेल्या कारखान्यामध्ये नोकरी मिळत नाही. बेकारी घालवायची असेल तर उद्योग-धंदे वाढले पाहिजेत. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यासाठी सुनिल शेळके यांच्यासारख्या तडफदार तरुणाला आमदार केले पाहिजे, असे पवार म्हणाले.
चौदाशे कोटींमध्ये 14 रस्ते तरी केले का? - शेळके
उमेदवार सुनिल शेळके यांनी विद्यमान आमदारांवर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, मावळ गोळीबारप्रकरणात निष्पाप लोकांचा बळी गेला. तालुक्यातून मोठमोठ्या कंपन्यांचे स्थलांतर झाले. 10 वर्षे इथल्या आमदारांनी कामे केली असती तर ही जनता आज माझ्या पाठीशी उभी राहिली नसती. चौदाशे कोटी आणल्याच्या वल्गना करणार्यांनी 14 रस्ते तरी चांगले आहेत का? याचे उत्तर द्यावे. माय भगिनींची फसवणूक लावली आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी काय केले? तरुणांच्या हाताला काम नाही. मावळवासीयांनी मला संधी दिल्यास 25 हजार तरुणांना रोजगार देऊ, 5 वर्षांच्या आत मावळ तालुका खड्डेमुक्त करून दाखवू, अशी ग्वाहीही शेळके यांनी दिली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.