पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवेश करून सुनील शेळके यांनी उमेदवारी घेतली. भाजपाचे तगडे आव्हाण झेलत सुनील शेळके यांनी विजय मिळवून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना पराभूत केले. भाजपाच्या फुटी पडल्याचा राष्ट्रवादी कॉग्रेसने फायदा घेत मतांची लयलुट केली आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने सुनील शेळके हे विजयी झाल्यामुळे मावळमध्ये कई खुशी कई गम पाहायला मिळत आहे.
मावळ विधानसभा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला माणला जात आहे. या बालेकिल्यात राष्ट्रवादीने या निवडणुकीत सुरूंग लावला आहे. लोकसभेनंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विशेष मावळमध्ये लक्ष घातले होते. तर खासदार अमोले कोल्हे यांनी आपला करिष्मा दाखविला होता. तर शरद पवार यांनी सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्याचे गणित गुड उलगडले.
सुनील शेळके यांनी मावळमध्ये ग्रामिण भागात केलेली महत्वपूर्ण विकास कामांमुळे त्यांचा जनसंपर्क वाढला होता. त्याच बरोबर नागरिकांशी सुसंवाद ठेवला होता. त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. परंतु, भाजपाकडून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनील शेळके यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. आणि भाजपापुढे मोठे आव्हाण राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभे केले. या विधानसभेच्या निवडणुकीत कमळ फुलून न देता राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. राष्ट्रवादी कॉग्रेसला एक तरुण आमदार मिळाला असून मावळचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही प्रचारादरम्यान देत मावळातील जनतेच्या मनावर राज्य करून मोठ्या मताधिक्याने विजयी मिळविला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.