अजित पवार यांची 74 कोटी 42 लाखांची मालमत्ता


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अजित पवार आणि त्यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण ७४ कोटी ४२ लाखांची संपत्ती आहे. अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावे अधिक मालमत्ता असल्याचे त्यांनी दिलेल्या विवरण पत्रातून स्पष्ट झाले.
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून  राष्ट्रवादी काँग्रेस कडून  उमेदवारी अर्ज भरला आहे . पवार यांच्या नावे होंडा एकोर्ड, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे या तीन मोटारी आणि दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर आहेत. त्यांची किंमत सुमारे ८९ लाख आहे. पत्नीच्या नावेही इनोवा क्रिस्टा ही मोटार आणि एक ट्रॅक्टर आहे. पवारांकडे १३ लाख ९० हजारांचे, तर पत्नीकडे ६१ लाख ५६ हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. पवार दाम्पत्याच्या नावे सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे शेतजमीन, तर इंदापूर, लोणीकंद, जळोची, काटेवाडी येथे बिगरशेत जमीन आणि बांधकामे आहेत. त्यांची एकूण किंमत ५० कोटींहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नियमबा कर्जवाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यचा उल्लेखही आजित पवार यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.
* अजित पवार यांच्याकडील मालमत्ता
२७ कोटी २५ लाख ५६ हजार
’* पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडील मालमत्ता
४७ कोटी १६ लाख ४७ हजार
* वित्तीय कर्ज
* पवार- १ कोटी ५ लाख ५५ हजार
* पत्नी- २ कोटी ६८ लाख १४ हजार
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget