भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली- शरद पवार


तळेगाव दाभाडे (टाईमन्युजलाईन नेटवर्क):भाजपा सरकारच्या काळात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. आघाडीचे सरकार होते त्यावेळी पुणे जिल्ह्यात उद्योग धंदे आणण्याचे काम केले आहे.  या सरकारने मात्र, बेरोजगारी वाढविण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तळेगाव येथे केला.
तळेगाव येथे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार नाना नवले, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,बबन भेगडे, बापू भेगडे,माउली दाभाडे, विठ्ठल शिंदे,रमेश साळवे,चंद्रकांत सातकर बाळासाहेब ढोरे, उमेदवार सुनील शेळके आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, मावळातील निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी  ज्योतीषाची गरज नाही. तरुण,महिलांची उपस्थित पाहिल्यावर काही तरी बदल झाल्यासारखा दिसतोय.  याला दोन कारणे आहेत. आमच्या ज्येष्ठांनी तालुक्याच्या विकासासाठी दुरदृष्टी पाहिली आहे. मावळ तालुक्याच्या विकासासाठी सुनील शेळकेला संधी दिली पाहिजे. असे सांगण्यात आले. आणि त्वरीत निर्णय घेतला. येथे येवून पाहतोतर काय जनता जनार्धन सुनील शेळके यांच्या पाठीशी आहे. जनता जणार्धनच आता ठरविणार आहे. मावळचा आमदार कोण होणार? मंत्री महोदय आता तुम्ही ही गर्दीच पाहात बसा असा ही टोला लगावला.
राज्यात परिवर्तन करायचे आहे.माझे वय जरी झाले असेल तरी मै अभीभी जवान हु असे सांगत जनतेची सेवा करण्यासांठी वयाचे काही बंधन नसते. काम करीत राहायचे राज्यांच्या जणतेचा विकास करायाचा हेच लोकप्रतिनिधींचे काम असते.
राज्यात शेतकरी वर्गासाठी सरकारने घेतलेली भूमिका चुकीची आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपा सरकारच्या काळात तर एका माळकरी शेतकऱ्यांने मुलीच्या लग्नाच्या दिवशी बँकेने घरातील भांडी जप्त करून नेली. अखेर त्या शेतकऱ्याने इज्जती पोटी आत्महत्या केली. मात्र, बँकांना अनेक महाठक बुडवून गेले. त्यांचे कर्ज सरकारने माफ केले मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज या भाजपा सरकारला माफ करता आले नाही. असाही टोला शरद पवार यांनी लगावला.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget