सरकारी योजनांवर फोटो जरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे असले तरी सिंहाचा वाटा शिवसेनेचा:उद्धव ठाकरे


जुन्नर (टाईमन्युजलाईन नेटवर्क) सत्तेच्या आसपास तुम्ही पोहचत नाही म्हणून काहीही बोलत सुटलात.आम्ही चांगल्या योजना आणतोय तर तुम्ही आडवे का येत आहे. अनेक योजनांवर फोटो जरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे असले तर त्यात सिंहाचा वाटा हा शिवसेनेचा आहे.असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्नर येथे केले.
जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार शरद सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यावेळी बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, 10 रुपये जेवण आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी ही करणार म्हणजे करणारच. फक्त टीका करण्यासाठी ही निवडणूक नाही. विरोधक काहीतरी बोलणार मग त्याला प्रतिउत्तर देणार मग ते त्यावर काहीतरी बोलणार. यासाठी ही निवडणूक लढत नाही.
शरद पवार इडीसी लढले. बोलवला तेव्हा या मग पाहु काय होत आहे ते पुढे. सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले. ज्यांना स्वतःचं काय होणार हे माहीत नाही. ते तुमचं काय भल करणार आहे. याचा विचार तुम्ही करावा अशी साद घालत  शिव आरोग्य योजना मी देणार म्हणजे देणारच. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणारच असे स्पष्ट केले.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget