ओतूरला मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा रँलीओतूर,  ( टाईम न्युजलाईन नेटवर्क
)
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मतदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. विध्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्लोगन तयार करून मुलांनी घोषणा दिल्या.ओतूर गावठाणातुन प्रभात फेरी     

काढली पाढरी मारूती मंदिराजवळ  नागरिकांसमवेत मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

येथील चैतन्य विद्यालय,गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान करा,मतदान हा आपला हक्क आहे याची जाणीव  करण्यासाठी बुधवार दि.२ रोजी सकाळी ओतूर गावठाणातुन जनजागृती फेरी, चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते.यामध्ये सुमारे१२५० विद्यार्थ्यांंनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांनी माझे मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो, मतदान करा मतदान करा लोकशाहीला बळकट करा, वोट हमारा है अनमोल कभी न लेंगे उसका  मोल, आवो करे मिलकर मतदान जिससे बनेगा देश महान अशा घोषणा देत ओतूर गाव व ओतूर परीसरातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

या जनजागृती फेरीत विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे,मुख्याध्यापिका मंगल साबळे,कैलास महाजन,प्रदिप मिरगे,शोभा तांबे,रावसाहेब कडाळे,संजय ढमढेरे, बबन डुंबरे , संतोष कांबळे, राजाराम शिंदे, मिलिंद खेत्री, गोपाळ डुंबरे, ज्ञानेश्वर वळे, लक्ष्मण दुडे, दयानंद सोनवणे, विशाल चौधरी, सत्यवान खंडाळे, रोहीणी घाटकर, सोनाली माळवे, सोनाली पतंगे, शुभांगी मुरादे, सुनिल शितोळे, ईश्वर ढमाले, तेजस ढमाले आदी शिक्षक सहभागी झाले होते.

मतदार जनजागृती करण्यासाठी आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेत नेहा राम, तेजस्वी जाधव, मनस्वी डोके,निलकमल डुंबरे, आर्या कुलकर्णी, ईश्वरी मोरे, प्रांजल तांबे, सई तांबे, प्रथा पिंपळे, सार्थक नलावडे, पियुष सुर्यवंशी , प्रणव सोनवणे, जान्हवी घोलप या विद्यार्थ्यांनी क्रमांक संपादन केले.Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget