सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो - बापू भेगडे वडगाव-मावळ भागात प्रचारफेरी, पदयात्रांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादतळेगाव,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) -  मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचा गुरुवारी वडगाव मावळ, कामशेत भागात दौरा झाला. विविध गावांमधून काढलेल्या प्रचारफेऱ्यांना, पदयात्रांना स्थानिक ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना बापू भेगडे बोलत होते. आमच्याकडे कामे झाली, ती राष्ट्रवादीने केली. भाजपाने आमच्याकडे कसलेही काम केले नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आमच्या गावातून जास्त मतदान देऊन भेट देणार आहोत, असे मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले. 

वडगाव येथे गुरुवारच्या आठवडे बाजारात फेरफटका मारत सुनिल शेळकेंनी शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधला. वडगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचारफेरीत जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, तुकाराम ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे, हेमांगी ढोरे, मीनाक्षी ढोरे, प्रमिला बाफना तसेच मंगेशकाका ढोरे, गंगाराम ढोरे, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, भाऊ ढोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget