राजगुरूनगर (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
तीन लाखांच्या कोंबड्या चोरणाऱ्यांना खेड-राजगुरूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टेम्पोभर कोंबड्या कमी किमतीत विकण्याचा सौदा सुरू असतानाच तिनजनांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळूगे-पडवळ येथील पोल्ट्री फार्ममधून या कोंबड्या काल रात्री मुंबईला घेऊन निघाले होते, तेंव्हा चौघांनी खरपुडी येथे टेम्पोला दुचाकी आडवी लावली. तिथून गाडीचा ताबा घेत मंचर येथील एका पोल्ट्रीत कोंबड्या ठेवल्या आणि टेम्पो पुन्हा चालकाला दिला. तर चाकणमध्ये किंमतीत कोंबड्या विकण्याचा सौदा सुरू होता. तेंव्हा खेड-राजगुरूनगर पोलिसांनी तपासाची चक्र हलवत बिंग फोडले. तिघांना अटक केली असून, एकाचा शोध सुरु आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.