352 सखी मतदार केंद्रात चालेल, केवळ महिला राज !



मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी352 सखी मतदार केंद्रे राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे केंद्र उभारले जाईल.
या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असतील.
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
सर्वकाही महिलांकडूनच संनियंत्रित करण्यात येणाऱ्या या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये कोणत्याहीविशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नयेअसे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्याआवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळीरंगरंगोटीसह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येईल.
अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्षपुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालयपोलीस ठाण्यानजीक अशी केंद्र उभारण्यातयेतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची,सखी मतदान केंद्राकरिता विशेष निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget