October 2019


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) साहित्य, संस्कृती, शिक्षण, राजकीय, उद्योग क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांसह पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांच्या उपस्थितीत रविवारी गप्पांची मैफल रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित दिवाळी फराळ उपक्रमाचे.
     पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन (बासरी सभागृह) येथे रविवारी (दि. 27) आयोजित केलेल्या दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रामचंद्र देखणे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, महापौर राहुल जाधव, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शत्रृघ्न काटे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, संजय काटे, तसेच ओमप्रकाश पेठे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, पोलिस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, उद्योजक बाळासाहेब कदम, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनीच दिवाळी फराळाचा आनंद घेत दिलखुलास संवाद साधला. दोन तास गप्पांची मैफल रंगली. उखाळ्या - पाखाळ्या निघाल्या. त्यातून अनेकदा हास्याचे कारंजे फुलले. डॉ. कोत्तापल्ले आणि डॉ. देखणे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.
     यावेळी डॉ.कोत्तापल्ले म्हणाले की, विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र यावे म्हणून दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेला दिवाळी फराळ हा उपक्रम म्हणजे आनंदाची पर्वणी आहे. अशा उपक्रमातून पिंपरी चिंचवडचा आणखी विकास व्हावा व शहराला साजेसा सांस्कृतीक चेहरा निर्माण व्हावा व शहराला साजेसा सांस्कृतीक चेहरा निर्माण व्हावा.
      डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, भेद हा अंधार आहे तर अभेद हा मोठा उजेड आहे. अभेदातून उजेड निर्माण करावा, या भावनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळी अनुभूती आहे. राजकारणातील मतभेद दूर ठेवून एका व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांनी, साहित्यकांनी एकत्र येवून केलेला हा कार्यक्रम शहरातील एकमेव उदाहरण आहे.
   ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने ऋण व्यक्त केले. सुत्रसंचालन नाना शिवले आणि आभार सचिन साठे यांनी मानले.


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी विजयश्री खेचून आणली तर पिंपरीत शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना धोबी पछाड देत राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे यांनी विजयी मिळविला. पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसने पिंपरीत बालेकिल्ला शाबूत ठेवला. तर चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी जोरदार टक्कर दिली. परंतु, भाजपाने आपला गड राखत जगताप यांनी हॅट्रीक केली.
चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला माणला जातो. या बालेकिल्यात भाजपाचे तगडे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी विकासाच्या जोरावर निवडणुक लढविली. चिंचवड मतदार संघात केलेला विकास हाच निवडणुकीत मुख्यमुद्दा होता. त्यांना शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी जोरदार टक्कर देत विजयासाठी झुंजवत ठेवले होते. कलाटे यांना महाआघाडी व मनसेसह वंचित आघाडीने पाठीबा दिला होता. परंतु, त्याचा जास्त काही फायदा झाला नाही. एकेकाळी लक्ष्मण जगताप यांचे नेतृत्वाखाली राहाणारे सर्वच कार्यकर्ते एकत्र येवून जगताप यांना टक्कर देण्याचा चंग बांधला होता. परंतु, त्याला यश आले नाही. अखेर जगताप यांनी अनुभवाच्या व राजकीय चाली खेळून निवडणुकीत विजयी मिळविला.
पिंपरीत राष्ट्रवादीचे नगरसेवक आण्णा बनसोडे यांना शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी झुंजवत ठेवले होते.राष्ट्रवादीचे बनसोडे यांनी निवडणुकीत चंग बांधला की अभी नही तो कभी नही असे नियोजन करून निवडणुकीत उतरले होते. झोपडपट्टीमध्ये जनसंपर्क वाढून मतदान आपल्या पदरात पाडले होते. मात्र,पिंपरी मतदानाचा टक्का घसरला होता. त्याचा फायदा आण्णा बनसोडे यांना झाला. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आघाडी न घेतल्यामुळे आण्णा बनसोडे हे सहज विजयी झाले. 


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): भोसरी विधानसभा मतदार संघात फक्त महेशदादा लांडगे यांचाच करीष्मा चालला आहे. आमदार महेश लांडगे यांनी प्रचारातही आघाडी घेतली होती. तर विरोधी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना आघाडीने पाठींबा देवून मोठे आव्हाण तयार केले होते. परंतु, या सर्वच आव्हाणांना छेद देत महेश लांडगे हे मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले.
एक गाव भोसरी अन्‌ दहा गावे दुसरी अशी म्हण प्रख्यात आहे. भोसरीगावातून भरघोस मते पडल्यामुळे महेश लांडगे यांचा विजयात मोठे मताधिक्य वाढले आहे. विकासाचा मुद्दा प्रचारात लावून धरला होता. तर मुख्यमंत्री यांची रॅली आणि खासदार गिरीष बापट यांची सभा निर्णायक ठरली आहे. गत विधानसभा निवडणुकीतही आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष असूनही विजयश्री खेतून आणली होती. समाविष्ट गावात झालेला विकास आणि २०-२० फॅार्म्युला यशस्वी ठरला.
भोसरीत माजी आमदार विलास लांडे यांनी ही अपक्ष लढून महाआघाडीचा पाठींबा घेतला होता. परंतु, त्याचा फायदा लांडे यांना उठवता आला नाही. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांनी निवडणुकीदरम्यान  भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे मतांच गणित बिघडले. त्याचा फायदा भाजपाला सहज झाला. पाच वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर महेश लांडगे यांनी विजय सहज खेचून आणला. 


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवेश करून सुनील शेळके यांनी उमेदवारी घेतली. भाजपाचे तगडे आव्हाण झेलत सुनील शेळके यांनी विजय मिळवून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना पराभूत केले. भाजपाच्या फुटी पडल्याचा राष्ट्रवादी कॉग्रेसने फायदा घेत मतांची लयलुट केली आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने सुनील शेळके हे विजयी झाल्यामुळे मावळमध्ये कई खुशी कई गम पाहायला मिळत आहे.
मावळ विधानसभा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला माणला जात आहे. या बालेकिल्यात राष्ट्रवादीने या निवडणुकीत सुरूंग लावला आहे. लोकसभेनंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विशेष मावळमध्ये लक्ष घातले होते. तर खासदार अमोले कोल्हे यांनी आपला करिष्मा दाखविला होता. तर शरद पवार यांनी सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्याचे गणित गुड उलगडले.
सुनील शेळके यांनी मावळमध्ये ग्रामिण भागात केलेली महत्वपूर्ण विकास कामांमुळे त्यांचा जनसंपर्क वाढला होता. त्याच बरोबर नागरिकांशी सुसंवाद ठेवला होता. त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. परंतु, भाजपाकडून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनील शेळके यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. आणि भाजपापुढे मोठे आव्हाण राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभे केले. या विधानसभेच्या निवडणुकीत कमळ फुलून न देता राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. राष्ट्रवादी कॉग्रेसला एक तरुण आमदार मिळाला असून मावळचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही प्रचारादरम्यान देत मावळातील जनतेच्या मनावर राज्य करून मोठ्या मताधिक्याने विजयी मिळविला. 


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ९९५८ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे  यांना ३०७४४
मतांनी आठवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप-५२३६२मते तर-९९५८आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-४२४०४ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ६४५३५ मते तर-३०७४४आघाडी
अपक्ष-विलास लांडे ३३७९१


पुणे (टाईमन्युजलाईन नेटवर्क): महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल काही वेळातच पूर्ण जाहिर होईल परंतु, संध्याच्या मतमोजणीत राज्यात महायुतीच्या १६५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीच्या ९२ उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कोण मारणार बाजी याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर भाजपाने १०१,शिवसेना ६४,राष्ट्रवादी ५२, कॉग्रेस ३९,तर मनसे १,वंचित बहुजन  आघाडीने ३ जागांवर आघाडी घेतली आहे. पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ९८२४ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे यांना सातवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप- ४७०७०मते तर-९८२४आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-३७२४६ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
सहावी फेरी
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ४६८५१ मते तर-२१३७९आघाडी
अपक्ष-विलास लांडे २५४७६


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ५७८१ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे १७३२५ मतांनी पाचवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप- ३३४८१मते तर-५७८१आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-२७६७७ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ३९१०६ मते तर-१७३२५आघाडी
अपक्ष-विलास लांडे २१७८१


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप २३४७ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे१४७०४ यांनी चौथ्या फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप-आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे -आघाडी
अपक्ष-विलास लांडे


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप १८०० आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप-आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे -आघाडी
अपक्ष-विलास लांडे


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून राहुल कलाटे, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. तर पोस्टल मतांमध्ये भोसरीमधून महेश लांडगे तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी आघाडी घेतली आहे. 


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश लांडगे यांची कुंडली भोसरीतील सभेत जनतेसमोर मांडली. भंगार चोर असणारा हा आता नागरिकांच्या कराच्या पैशांवर दरोडा टाकत आहे. या भंगार चोर औरंगाबादेत पकडला गेला होता. रातोरात जाऊन मी त्याला सोडवून आणले. २००२ मध्ये आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मी त्याला नगरसेवकपदी निवडून आणले. आता त्याला पराभव दिसू लागला आहे. तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणून रडायला लावणार, त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या पण त्यानेच कराव्यात. हफ्ते पण त्यानेच गोळा करावेत, अशा शेलक्या शब्दांत विलास लांडे यांनी महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर झालेल्या प्रचार सभेत लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मोहिनी लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक समीर मासुळकर, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, जालिंदर शिंदे, सतीश भोसले, गणपत आहेर, सतीश थिटे, संदिपान झोंबाडे, भरत लांडगे, ईश्वर ठोंबरे, दत्ता गव्हाणे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना विलास लांडे म्हणाले, “मी हवेली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन महेश लांडगे यांना नगरसेवकपदी निडून आणले. त्यावेळी मला अजितदादा म्हणाले की हा जकात चोरतो, मारामाऱ्या करतो. नगरसवेक झाला तर महापालिका विकून खाईल. आज तेच झाले आहे. पण मी त्यावेळी माझे नाते जपले. याला औरंगाबादेत भंगार चोरीत पकडण्यात आले होते. मी रातोरात जाऊन याला सोडवून आणले. नाते महत्त्वाचे समजून हे मी सगळे केले. आता ते ज्या ऑफिसमध्ये बसतात, तेही माझेच आहे. मी त्याला नगरसेवक केले. त्याने आत्मचिंतन करावे.
या आमदारांचा व्यवसाय काय आहे. भंगार चोरण्याचा, जागा बळकावण्याचा यांचा व्यवसाय आहे. महापालिकेत नागरिकांनी भरलेल्या करांच्या पैशांवर दरोडा टाकणारा हा आमदार आहे. आता याने मतदारसंघातील मुरूम चोरून विकायचा नवीन धंदा सुरू केला आहे. मतदारसंघातील टपरीवाले, रिक्षावाले आणि बसचालकांकडून हफ्ते गोळा केले जातात. मागे-मागे फिरणाऱ्या हफ्ते गोळा करायला लावतो. तरुणांवर चांगले संस्कार करण्याऐवजी त्यांना वाम मार्गाला लावतो. तू चोऱ्या केल्यास तसे त्यांना शिकवू नको, असा सल्लाही त्यांनी दिला.
आता निवडणुकीत पराभव दिसू लागताच तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणणार रडायचे नाटक करणार. त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या कराव्या तर त्यानेच कराव्यात, हफ्ते गोळा सुद्धा त्यानेच करावे. संपूर्ण मतदारसंघात दहशत पसरवून ठेवली आहे. पण जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर विलास लांडे सोबत आहे. येत्या २१ तारखेला कपबशी चिन्हावर मतदान करून ही दहशत, हफ्तेगिरी, भंगारचोरी आणि दादागिरी मतदारसंघातून कायमची हद्दपार करा, असे आवाहन लांडे यांनी मतदारांना केले.”
यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने सभेत बोलताना म्हणाले, “मागील निवडणुकीत खोट्या आश्वासनाला बळी पडून दैवतासासमान विलास लांडे यांच्या विरोधात काम केले. त्या चुकीबद्दल मी विलास लांडे यांची माफी मागतो. आताच्या आमदाराला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदतीचा पवित्रा घेतला होता. त्याचा आज मला पश्चात्ताप होत आहे. प्रायश्चित करण्यासाठी व हिशोब चुकता करण्यासाठी निवडणुकीत विलास लांडे यांना निवडून आणणार आहे. आताचे आमदार स्थायी समिती सभापती असताना भोसरी उड्डाणपुलाजवळ शीतलबाग येथे ७० लाखाचे पादचारी पूल साडेसात कोटींना उभारण्यात आले. मोशीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात एका माजी पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाची आणि या आमदाराची डील झाली आहे. त्यातून ५० कोटी रुपये लुटले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेची कामे तीनच ठेकेदारांना वाटून यांनी टक्केवारी खाल्ली आहे. ते तीन भाऊ आहेत. त्यातील एकजण कामाला जातो. दुसरा काय करतो ते तुम्हाला माहिती आहे. तिसरा आमदार आहे. यांचा काय धंदा आहे?, कुठून पैसे आणले यांनी?, यांच्याकडे दीड कोटींची गाडी आली कोठून? सामान्यांचे मुंडकु मुरडून हे सर्व आणले आहे.


अपक्ष उमेदवार विलास लांडे हे आमदार असताना त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे महापौर होत्या. त्यावेळी लांडे यांनी महापालिकेत येऊन कधी कोणाकडे चिरीमिरी मागितल्याचे आम्ही ऐकले सुद्धा नव्हते. आजची परिस्थिती एक गेला की दुसरा आला, तो गेला की तिसरा आला तो गेल्यानंतर चौथा येतो आणि गोळा करून जातो, असा कारभार सुरू आहे. चऱ्होलीत अक्षरशः लूटमार सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांना व बिल्डरांना लुटले जात आहे. विजेचे मीटर देतानाही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात आहे. यांनी अक्षरशः कहर केला आहे. यांनी चूक केली आहे आणि नागरिक चुकीला माफी देणार नाहीत. अपक्ष उमदेवार माजी आमदार विलास लांडे यांनी कधी कोणाच्या मुंड्या मुरगळल्या नाहीत, हफ्ता मागितला नाही, भ्रष्टाचार केला नाही. मात्र आताच्या आमदाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या आमदाराची फडफड सुरू आहे. या निवडणुकीत गर्वाचे घर खाली नक्की होईल आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे हे नक्की निवडून येणार, असा विश्वास दत्ता साने यांनी व्यक्त केला.”


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
     पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आज सकाळी खराळवाडी, कामगारनगर व गांधीनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली.
     सकाळी अकरा वाजता खराळवाडी येथील खराळआई मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात झाली. रिपब्लिकन पक्षाचे लक्ष्मण गायकवाड, विकास कांबळे, भारत पुंडे, रघुनाथ सोनटक्के, दिनेश म्हस्के, संभा वाघमारे, बंडू वाघमारे, शरद साबळे तसेच सेना-भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने उमेदवार ॲड. चाबुकस्वार यांच्यासमवेत होते.
     संपूर्ण खराळवाडी, गीता माता मंदिर परिसर, कामगारनगर, व गांधीनगर भागातून पदयात्रा काढण्यात आली.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) : भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे मागील पाच भोसरी परिसरात अनेक समाजोपयोगी विकासप्रकल्प विकसित करण्यात आले. त्यांचा भोसरी व्हिजन 20-20 हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
माजी खासदार आढळराव म्हणाले की, उद्योग व्यवसायासाठी देशभरातून कामगार पिंपरी चिंचवडला स्थायीक होण्यासाठी येतात. त्यामुळे शहराचा नागरीकरणामध्ये देशात पहिल्या पाच मध्ये क्रमांक आहे. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा भोसरी व्हिजन 20-20 हा संकल्प शहराला निश्चितच लाभदायी ठरेल.
आमदार महेश लांडगे यांनी भोसरीच्या विकासाचे स्वप्न पाहत हाती घेतलेला इंद्रायणी सुधार प्रकल्प, नाशिक फाटा ते चाकण, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प, मल्टिमोडल हब, वेस्ट टू एनर्जी, देहू आळंदी पुणे पालखी महामार्ग, संविधानभवन, संतपीठ, सफारीपार्क, भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल, स्पोर्ट्‌स सिटीच्या दृष्टीने इंद्रायणीनगर, गवळीनगर, भोसरी  गावजत्रा मैदान, मोशी चिखली प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी येथे विकसित केलेले क्रीडा प्रकल्प, सफारी पार्क, नामांकित  शिक्षण संस्थांसाठी प्राधिकरण परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची धडपड. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व स्मार्ट सिटीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच विकासाचे मॉडेल म्हणून च-होली गावचा कायापालट होणार आहे. आरोग्य सुविधेसाठी उभारण्यात आलेले नूतन भोसरी रुग्णालय, भोसरी परिसराचा ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी ग्रीन भोसरी क्लिन भोसरी प्रकल्प आणि उद्याने व क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा. आंद्रा-भामा-आसखेड पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजनांची आठवण माजी खासदार आढळराव पाटील यांनी करून दिली.
इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकण्यात आलेले पाऊल महत्वाचे व ऐतिहासिक आहे. त्याबरोबरच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न हातावेगळे करण्यासाठी राबविण्यात आलेल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्पावधीत होत आहे. विकासाचे ध्येय बाळगणा-या या युवा नेतृत्वास पुन्हा भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार आढळराव-पाटील यांनी केले.


पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने समाविष्ट गावांना चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेले मिळकतकर माजी आमदार विलास लांडे यांनी सरकारकडून माफ करून आणले. ही रक्कम ७२ कोटी रुपये आहे. सामान्यांचा करमाफ करून आणणारे विलास लांडे हे शहरातील एकमेव आमदार आहेत. मात्र त्यांनी त्याचे कधी मार्केटिंग केले नाही. राजकीय लाभ उठविला नाही. करमाफी करून आणणारा विलास लांडे यांच्यासारखा नेताच अनधिकृत बांधकामे, शास्तीकरासारखे प्रलंबित प्रश्न सोडवू शकतो. सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे, शास्तीकर या प्रश्नांचे गाजर दाखविण्यापलीकडे काही काम केले आहे. प्रश्न सुटल्याचे खोटे सांगून पुन्हा मते मागायला येत आहेत. मात्र तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगरमधील जनतेने अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्यासाठी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी बुधवारी (दि. १६) सांगितले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यावेळी नगरसेवक प्रवीण भालेकर बोलत होते. विलास लांडे यांनी तळवडे गावच्या कमानीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि गावठाणातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरूवात झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, हभप शिवाजी नखाते, हभप रंगनाथमहाराज भालेकर, बाळासाहेब वाळुंज, मनसेचे विभागप्रमुख विशाल मानकरी, सुजाता काटे, संगीता देशमुख, अरूण थोपटे, सुधाकर दळवी, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष संदिप जाधव, हभप हरिभाऊ ताम्हाणे, अंकुश नखाते, तळवडे विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन तानाजी बाटे, कुंदन भालेकर, सुरेश चव्हाण, हिरामण नखाते, तुकाराम ऊर्फ बबडी भालेकर आदी उपस्थित होते. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर, रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर भागात पदयात्रा काढून ताम्हाणेवस्ती येथे समारोप करण्यात आला.
नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना आकारण्यात आलेले मिळकतकर अन्यायकारक होते. भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी राज्य सरकारकडून समाविष्ट गावांना आकारलेला अन्यायकारक कर माफ करून आणला. तब्बल ७२ कोटींचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय घेण्यास सरकारला त्यांनी भाग पाडले. सामान्यांसाठी असे काम करणारे लांडे हे शहरातील पहिले आमदार आहेत. या कामाचे त्यांनी कधी मार्केटिंग करून राजकीय फायदा उठविला नाही. समाविष्ट गावांतील नागरिकांना त्यांची जाण ठेवलेली आहे. हे नागरिक विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
विरोधक गेल्या पाच वर्षांपासून भोसरी मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नाचे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये नुसते मार्केटिंग करून प्रसिद्धी मिळवत आहेत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर हे प्रश्न सुटल्याचे सांगून वर्तमानपत्रांमध्ये स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यासाठी पान-पानभर जाहिराती दिल्या जात आहेत. मतदारसंघात फ्लेक्सबाजी करून प्रश्न सुटल्याचा भास निर्माण केला जात आहे. निवडणुकीतही हाच प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात शहरातील एकाही अनधिकृत बांधकामधारकाला दिलासा मिळालेला नाही. तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर या भागातील जनता अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नाने सर्वाधिक त्रस्त झालेली आहे. नोटिसा आणि शास्तीकराच्या आकड्याने येथील नागरिकांची झोप उडाली आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे काही देणे-घेणे नाही. हे आता जनतेलाही समजले आहे. हे सत्ताधारी फक्त सोशल मीडियावर मार्केटिंग करणारे आहेत, हे जनतेने जाणले आहे.


पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) - सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. मागील पंधरा वर्षांत दुसर्‍या पक्षाच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय इतरांनी लाटू नये असे आवाहन करताना यंदा चिंचवड विधानसभेत परिवर्तन करण्याचा निर्धार पिंपळे गुरव, सांगवीतील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय उमेदवार उमेदवार राहूल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित या रॅलीत राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याच्या घोषणा देण्यात आल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, मनसे, विविध संघटना, वंचित बहुजन आघाडीसस अनेक पक्ष, आजी माजी पदाधिकारी एकवटल्याचे चित्र दिसले. सांगवी, पिंपळेगुरव परिसरात काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे हा संपूर्ण परिसर कलाटेमय झाल्याचे पहावयास मिळाले. रॅलीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, तानाजी जवळकर, सुनिल ढोरे, अमर अदित्य, शिवाजी पाटोळे, बाळासाहेब पिलेवाट, सुरेश सकट, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश ढोरे, पंकज कांबळे, निखील चव्हाण, अमरसिंह आदियाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
नागरिकांशी संवाद साधताना नगरसेवक नवनाथ जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसराचा कायापालट झाला. राजमाता जिजाऊ उद्यान, निळू फुले नाट्यगृह, संत सावता माळी उद्यान, बॅडमिंटन हॉल, पाण्याच्या टाक्या, शिवसृष्टी उद्यान, सांगवी फाटा येथील सब-वे, डी. पी. तील रस्त्यांचे जाळे आदी सुविधांसह मुलभूत सेवा देण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा चिंचवड मतदार संघ बनविण्यासाठी राहुल कलाटे यांच्या पाठिशी असल्याचे नवनाथ जगताप यांनी सांगितले.
माजी नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले की, शहराचे राजकारण ढवळून टाकणारे नेते, कारभारी या प्रभागाचे आमदार म्हणून नेतृत्व करीत आहेत. मात्र, या भागासह शहरातील अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत गेल्या नऊ-दहा वर्षांपासून राजकारण करीत आहेत. 2004 ते 2014 या काळात कोणाच्या सहकार्याने विकास कामे केली, मागील 15 वर्षांत विधान परिषद आणि विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले, शंभर टक्के शास्ती कर माफी का झाली नाही, नवी सांगवीत मोफत पाणी मीटर बसविले असताना  पिंपळे गुरवच्या नागरिकांना पाणी मीटर विकत घ्यावे लागले यामागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल शितोळे यांनी केला.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, पिंपळे गुरवमधील जिजाऊ उद्यानाला दुबईच्या धर्तीवर मिरॅकल गार्डन म्हणून विकसित करण्याची घोषणा करीत उद्यान बंद करण्यात आले. आजही उद्यानाचे काम अर्धवट आहे. उद्यान बंद असताना आचारसंहितेच्या तोंडावर उद्घाटनाचा देखावा केला गेला. चिंचवड विधानसभा मतदार संघात एकही नवा प्रकल्प आणला नाही, आता तर कचला संकलन शुल्काच्या नावाखाली नागरिकांवर दरमहा खर्चाचा भार लादण्यात आला आहे. सुस्थितीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले. विशेष म्हणजे त्यासाठी सल्लागार नेमून त्यावर खर्चाची उधळपट्टी केली. महापालिकेच्या जीवावर भाचे, नातेवाईक गब्बर झाले पाहिजेत, हाच कारभार मागील पाच वर्षात केल्याचा आरोप राजेंद्र जगताप यांनी केला.


पिंपरी,
(टाईम न्युजलाईन नेटवर्क) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा विकास सुरू आहे. नुसता गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामे करणारा आमदार मतदारसंघाला हवा आहे. त्यामुळेच या निवडणुकीत विलास लांडे यांना परिषदेने पाठिंबा दिल्याचे परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी सांगितले.
परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी अॅड. भालचंद्र भुजबळ, आनंदा कुदळे, सुदाम तळेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, धनंजय भालेकर, राहुल बनकर, राजेंद्र म्हेत्रे यांच्यासह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


अॅड. चंद्रशेखर भुजबळ म्हणाले, “विलास लांडे यांनी दहा वर्षे आमदार असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा पाया रचला. अनेक मोठे प्रकल्प राबवून या मतदारसंघातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. त्यांचे राजकीय नेतृत्व कणखर नेतृत्व आहे. तेच या मतदारसंघाचा कायापालट करू शकतात. त्यासाठी त्यांनी पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. त्यासाठीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने विलास लांडे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अॅड. भुजबळ यांनी सांगितले.”


पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) -  मोशी येथे सिंगापूर मधील उद्यानाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यास शासनाची मंजुरी मिळाल्याचे सांगत ढोल बडविण्यात आले. मात्र, त्याबाबतचा पर्यटन विभागाचा अथवा शासनाचा लेखी आदेश कुठे आहे, असा खोचक सवाल भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी केला. काम कमी आणि फेकाफेकी जास्त अशा कारभारामुळे मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विकासाला उतरती कळा लागली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
प्रचार फेरी दरम्यान विलास लांडे बोलत होते. ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट नंबर 646 या सरकारी गायरान जमिनीवर सुमारे 33.72 हेक्टर क्षेत्र आरक्षण क्रमांक 01/207 सफारी पार्क म्हणून आरक्षित करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी मागितली. मोशी ग्रामस्थांवर यापूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचा शंभर टक्के कचरा लादण्यात आला आहे. त्याचा परिणाम अद्यापही मोशी भागातील सर्वसामान्य जनता सहन करीत आहे. कचरा डेपोमुळे बफर झोनचाही प्रश्‍न उद्भवला होता. या कचरा डेपोमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेचा दररोज सुमारे आठशे ते साडेआठशे मेट्रिक टन कचरा या भागात टाकला जात आहे. असे असताना पुणे महापालिकेचा कचरा लादण्याचा प्रयत्न झाला. सजग मोशीकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला. प्रसंगी बंद पाळला, आंदोलन केले. मात्र, हा डेपो आपण पळवून लावल्याचे काहीजण सांगत आहेत.
वास्तविकतः पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. पालकमंत्री देखील भाजपचेच आहेत. त्यांच्याच सुपिक डोक्यातून पुण्याचा कचरा मोशीकरांवर लादण्याची कल्पना पुढे आली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मागेपुढे कोण फिरत हे अख्ख्या पिंपरी-चिंचवडकरांना माहिती आहे. पुण्याचा कचरा मोशीत आणण्यासाठी छुपा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय पुणे महापालिका एवढे धाडस करणार नाही. परंतु, मोशीकरांच्या भावना तीव्र असल्यामुळे आपलाही विरोध असल्याचे दाखविण्यापलिकडे स्थानिक आमदारांना पर्याय राहिला नाही. त्यातून सफारी पार्कचे खुळ पुढे आणण्यात आले. वास्तविकतः पाच वर्षे सत्ता उपभोगत असताना निवडणुकीच्या तोंडावरच पर्यटन मंत्र्यांची बैठक घेवून सफारी पार्कला मंजुरी मिळविल्याचे ढोल का बडविण्यात आले, हा खरा प्रश्‍न आहे. पुण्यातल्या भाजपच्या मंडळींनीच हा कचरा डेपो लादण्याचा डाव आखला होता, असा आरोप लांडे यांनी केला. कचरा डेपोच्या जागेवर सफारी पार्क होणार, त्यासाठी शासनाचा निधी मिळणार, असे वृत्त निवडणुकीच्या तोंडावर सोईस्कर पसरविण्यात आले. वास्तविकतः ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला हस्तांतरीत झालेली नाही. पर्यटन मंत्र्यांनी सफारी पार्कला मंजुरी दिली असली तरी त्याचे कोणतेही लेखी आदेश अथवा शासनाचा अध्यादेश नाही. असे असताना सफारी पार्कचे काम सुरु झाल्याच्या आर्विभावात सुरु असलेले ‘मार्केटिंग’ भोसरीकरांच्या नजरेत धूळफेक करणारे आहे. सफारी पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) देखील तयार नाही, असे असताना दीड हजार कोटी खर्चून हे पार्क उभे करण्याचा दावा म्हणजे हवेत इमले बांधण्याचा प्रकार आहे, अशी टीका विलास लांडे यांनी केली. 


तळेगाव (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की,पुरुषवर्ग घरात पैसे आले की, कधी व्यवसने करतात तर महिलांच्या हातात पैसा आलेला  थेट घरी जातात. मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर घरावर पैसे खर्च करतात. अशी टिपन्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तळेगाव येथे केली. थेट मुख्यमंत्री फडणविस यांनी पुरुषांनी अवहेलना केली.
तळेगाव दाभाडे येथे भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, सुर्यकांत वाघमारे,बाळासाहेब नेवाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणविस पुढे म्हणाले की, बाळा भेगडे यांना २८ हजार मतांनी विजयी झाले होते. तेव्हा ते राज्यमंत्री झाले आता ५६ हजारांनी विजयी करा त्यांना कॅबीनेटमंत्री करणार आहे.असे ही अश्वासन मुख्यमंत्री फडणविस यांनी दिले.
भाजपा सरकारने बचत गटाची मोठी चळवळ सुरु केली. या मध्यमातुन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व्यवसायाचे प्रशिक्षणही दिले जाणार असून उद्योगासाठी मार्केटींग उपलब्ध करून देणार आहे. बचत गटांना एक लाख रुपये बिन व्याजी कर्ज देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की,पुरुषवर्ग घरात पैसे आले की, कधी व्यवसने करतात तर महिलांच्या हातात पैसा आलेला  थेट घरी जातात. मुलांच्या शिक्षणावर आरोग्यावर घरावर पैसे खर्च करतात.असे  म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुरुषांची अवहेलना केली. 


पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – भोसरी मतदारसंघात सर्व पक्ष आपले मतभेद विसरून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना विजयी करणार आहेत. लांडे यांना मतदारसंघातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कष्टकऱ्यांनी आणि गोरगरीबांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे. सत्ताधाऱ्यांकडून भोसरी मतदारसंघ विकत घेतल्यासारखा कारभार सुरू आहे. लोकशाहीत लोक मालक असतात याचे भान त्यांना राहिलेले नाही. दहशतीच्या आणि पैशांच्या बळावर आपण कायम आमदार राहू असे काही जणांना वाटते. अशांना कायमचे घरी घालवण्याचे काम मतदारसंघातील जनतेने करावे, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी मंगळवारी (दि. १५) केले.
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी मंगळवारी निगडीतील यमुनानगर, साईनाथनगर, निगडी गावठाण या भागात पदयात्रेद्वारे प्रचार केला. त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच कष्टकरी महिलांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह भाजप आणि शिवसेनेतील नाराजांनीही पदयात्रेत लांडे यांना पाठिंबा दिला. लांडे यांनी या सर्वांचे आभार मानले. तसेच या सर्वांच्यामुळेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. चौकाचौकात महिलांनी लांडे यांचे औक्षण केले. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधून कपबशीला विजयी करण्याचे आवाहन केले.
निगडी गावठाणातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. लक्ष्मीनगर, दत्त मंदिर, सुवर्णयुग साईमंदिर, अमृता मठ, जेटीबी चौक, महादेव मंदिर, रत्ना हॉस्पिटल परिसर, शिवभुमी, श्रीनिवास हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर, राजनगर, पवळे हायस्कूल, अंजुमन सोसायटी, आझाद चौक, पीसीएमसी वासहत नवी व जुनी बिल्डिंग, साईनाथनगर, यमुनानगर, दत्त मंदिर परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, बीआरएसपीचे शहराध्यक्ष संजीवन कांबळे, बाळासाहेब वेदळेकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी आणि बीआरएसपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. आताचे आमदार हे मतदारसंघाच्या भकासाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे विलास लांडे यांना मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निगडीच्या संपूर्ण परिसराने लांडे यांच्या विजयाचा आधीच निर्धार केलेला आहे. मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अक्षरशः हैदोस घालण्यात आला आहे. जनतेने विश्वास ठेवलेल्या कथित पैलवानाने गोरगरीब आणि मागासवर्गीय लोकांचा विश्वासघात केला आहे. पाच वर्षात मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प उभारला गेला नाही. तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. उलट दुसऱ्यांनी केलेल्या कामांचेच हे श्रेय घेत फिरत आहेत. तेच सोशल मीडियावर दाखवून नागरिकांना फसवित आहेत. गतिमान सरकार आणि व्हिजन २०-२० म्हणून मतदारसंघातील जनतेला मूर्खात काढले गेले. व्हिजन नावावर आता पुन्हा आमदारकीला निवडून द्या म्हणत आहेत. कथित पैलवानाचे सर्व डावपेच जनतेने ओळखले आहे.
मतदारसंघात विकासकामांचा खोटा प्रचार सुरू आहे. कामे केली असती तर असे वागण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. विलास लांडे यांनी कामे केली पण कधी खोटे सांगितले नाही. मतदारसंघात जो काही विकास झाला तो विलास लांडे यांच्या माध्यमातून झाला. मात्र त्यांना कधी ऊर बडवून हे सांगण्याची गरज भासली नाही. मात्र आताचे सत्ताधारी न केलेल्या विकासकामांबाबत एवढा ऊर बडवत आहेत की जनतेला चीड येऊ लागली आहे. हा खोटपणा जनतेला आता सहन होत नाही. त्यामुळेच ही जनता आता चुकीच्या प्रवृत्तींना मतदारसंघात थारा देणार नाही. विलास लांडे यांच्या कपबशीला विजयी करून दमदार, रुबाबदार अशा काही विशेषणांसह लोकांना लुटणाऱ्यांना जनता मतदारसंघातून हद्दपार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : महायुतीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ भाजपला देण्यात आला. तेव्हापासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रिय आहे. त्यामुळेच विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचारापासून दूर रहावे. महायुतीचे उमेदवार आमदार लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सेनेने केला आहे, असे शिवसेनेच्या जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पिंपरी येथे आयोजित या पत्रकार परिषदेस महापौर राहुल जाधव, भाजपचे नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, सचिन सानप आदी उपस्थित होते.
सुलभा उबाळे म्हणाल्या की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक प्रामाणिकपणे भोसरीत प्रचार करीत आहेत. मात्र, विरोधक अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पिंपरीतील सभेला महेश लांडगे अनुपस्थित होते. प्रचार साहित्यात सेनेचे झेंडे नसल्याबद्दल विचारले असता उबाळे म्हणाल्या की, महेश लांडगे हे प्रचारात असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेला उशीरा पोहोचले, मात्र त्यांचे फोनवर बोलणे झाले, दोघांची भेटही झाली. लांडगे यांचे प्रचार साहित्य युती होण्यापूर्वी तयार होते. समन्वयासाठी बैठक झाल्यानंतर साहित्यात दुरुस्ती केली गेली. आम्ही सारेजण महेश लांडगे यांच्यासोबतच आहोत. तिकिट मिळविण्यासाठी सर्वांचे शर्तीथे प्रयत्न सुरु असतात, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघटनेची शिस्त पाळणारे आम्ही आहोत.
इरफान सय्यद म्हणाले की, आम्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रोज प्रचारात एकत्र फिरतो. आमच्याबरोबर पदाधिकारी, समन्वयक असतात. हे तरी अफवा पसरवणारांनी लक्षात घेतले पाहिजे.
शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, शिवसेनेच्या भूमिकेबाबत सोशल मिडियावर जे काही आले त्या अफवा आहेत. भोसरीत मतदारसंघ भाजपला गेल्यापासून विरोधक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, भोसरीत बंडखोरी झालेली नाही. अर्ज भरण्यापासून आम्ही महेश लांडगे यांच्या सोबत आहोत. शिवेसेनेच माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला. तेव्हाही सेनेने भूमिका स्पष्ट केली होती. सेना, भाजपची  युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली आहे. त्यामुळे वादाचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांनी चुकीच्या प्रचारापासून दूर रहावे, असे आवाहन आल्हाट यांनी केले.

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज लांडेवाडी झोपडपट्टी व फुलेनगर परिसर पिंजून काढला.
     आज सकाळी साडेदहा वाजता उमेदवार व आमदार ॲड. चाबुकस्वार यांचे लांडेवाडी येथे आगमन झाले. भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे, युवा सेना प्रमुख जितेंद्र ननावरे, युवा सेना शहरप्रमुख अभिजीत गोफण, स्वप्निल रोकडे, विभागप्रमुख अनिल पारचा, हाजी दस्तगीर, गणेश आहेर, रिपब्लिकन पक्षाचे बाळासाहेब भागवत, यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपथित होते.
     भगवे झेंडे, भगवे उपरणे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे सर्व उपरणे गळ्यात घालून कार्यकर्त्यांचा जथ्था लांडेवाडी येथे पोहोचून प्रचाराला सुरूवात झाली. घरोघरी पत्रके वाटत कार्यकर्ते पुढे जात होते. त्यापाठोपाठ महायुतीचे उमेदवार ॲड. चाबुकस्वार भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकांना हात जोडत अभिवादन करत पुढे जात होते. लांडेवाडी भाग संपूर्ण पालथा घातल्यानंतर महात्मा फुले नगर येथे सर्वजण जमा झाले. या भागातील सर्व नागरिकांना भेटून घरोघरी जात आमदारांनी आशिर्वाद मागितले.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 : मोशी आरक्षित जागेवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा कायापालट होणार असून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंत लोंढे यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, नगरसेवक वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सारीका बो-हाडे, अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, माजी नगरसेवक बबन बोराटे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, ज्येष्ठ नेते काळूराम सस्ते, प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे आदी उपस्थित होते.
यावेळी लोंढे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क व्हावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यास मान्यता दिली. या पार्कसाठी सुमारे 1500 ते 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पर्यटन विभाग (एमटीडीसी) माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरीत निधी पिंपरी चिंचवड महापालिका उभारणार आहे. तीन वर्षात हे सफारी पार्क साकारणार आहे. महापालिका आणि पर्यटन विभाग (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येणार आहे. शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल. देशात हा प्रकल्प राबविणारे हे पहिले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर होणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
लोंढे म्हणाले की, मोशी येथील शासकीय गायरान जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा यासाठी तातडीने एमटीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे. सफारी पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला लवकरात लवकर मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, च-होली भागाचा विकास झपाट्याने होत आहे. आमदार महेश लांडगे यांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजीवनी देण्याचे व्हिजन ठेवले आहे. त्यादृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार लांडगे यांनी चिखली, मोशी, च-होली आदी भागात महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याने या भागात विकासाची गंगा आली आहे. मोशी येथे होणा-या सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग व्यवसायाची वृद्धी होईल. स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही लोंढे यांनी सांगितले.ओतूर,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीत  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी मंगळवारी दि.१५ रोजी ओतूर गावठाणात पोलिसांनी संचलन केले. जुन्नरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी  दीपाली खंन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन झाले.ओतूर शहरातून पोलिसांनी व ( सी.आय.एस.एफ ) सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरीटी फोर्सच्या जवानांनी ओतूर गावठाणातुन सशस्त्र संचलन केले. यावेळी ओतूर शहर पोलिस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन ओतूर मुख्य बाजारपेठ,बसस्थानक व मोनिका चौकातुन  संचलन करण्यात आले.ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक  परशुराम कांबळे १५ पोलिस कर्मचारी,१० होमगार्ड,सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरीटी फोर्सचे एक अधिकारी आणि ५१ कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.निवडणुकीच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी संचलनातून दिला. ओतूर शहर पोलिस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन करण्यात आले.


विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
वाढत्या पाठिंब्यामुळे कलाटेंचे पारडे जड
पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने आज (सोमवारी) पाठिंबा देण्यात आला. तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड, नागरी हक्क सुरक्षा समितीचेही पाठबळ मिळाल्याने कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून सर्वपक्षीयांचे उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. मतदार संघातील उच्चशिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पदयात्रा, रॅलींना होणारी गर्दी, मतदार संघातील सोसायट्यांकडून मिळालेला पाठिंबा यामुळे कलाटे यांनी चर्चेचा नूर पालटून टाकला आहे. कलाटे यांची मतदार संघातील वाढती ‘क्रेझ’ तसेच सुशिक्षित व सर्वमान्य उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कलाटे यांना पुरस्कृत केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि मनसेने देखील कलाटे यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली. सर्वपक्षीय कलाटे यांच्या मागे एकवटल्याचे चित्र असतानाच सामाजिक संघटनांकडूनही त्यांना पाठिंब्याचा ओघ वाढला झाला आहे.
मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव विशाल जरे, जिल्हा संघटक लघु लांडगे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर संघटक रशिदभाई सय्यद, विनोद घोडके, वैभव जाधव यांनी राहुल कलाटे यांना पत्राद्वारे बिनशर्त पाठिंबा दिला.
शास्तीकर, रिंग रोड, अनधिकृत बांधकाम हे प्रश्न सोडवतो असे सांगून सत्तेत आलेल्या विद्यमान आमदारांनी यातील एकही प्रश्न आजपर्यंत सोडविला नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले भाजप सरकार मराठा बहुजन समाजाचे शोषण करीत आहे. मोदी, फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी अनेक पटीने वाढली आहे. फसव्या कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्‍यांचा आवाज दाबला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात, शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधु असे आश्वासन देणार्‍या या सरकारने स्मारकाची एकही विट रचली नाही. मात्र, काम सुरु होण्यापूर्वीच 80 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत. इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन करून तिथेही एक विट देखील रचली गेलेली नाही. तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, रस्त्याची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, आर्थिक मंदी याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असून याविरोधात राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडने नमूद केले आहे.
प्रचाराचा धडाका

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहूल कलाटे यांनी आज सोमवारीही जोरदार प्रचार केला. विविध सोसायट्यांमध्ये बैठका, कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत चिंचवडच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. दिवसेंदिवस कलाटे यांच्या प्रचारास जोरात पाठींबा मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी विधानसभेचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पायी फिरून पिंपरी कॅम्प ढवळून काढला.
     आज सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी येथील डिलक्स चौकातून पदयात्रेला सुरूवात झाली. खासदार श्रीरंग बारणे, महायुतीचे उमेदवार व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विभागप्रमुख अनिल पारचा, भाजपाचे पिंपरी विधानसभा मुख्य संयोजक राजू दुर्गे, नंदू भोगले, माधव मुळे, गणेश आहेर, खंडू शिरसाट, अनिस अत्तार, विष्णु साळवी, श्यामा शिंदे, लच्छु बुलानी, हाजी दस्तगीर मनियार, जितू मंगतानी, सावला तोतानी, रोमी संधू, बबलू सोनकर, गोपाळ खत्री, विभागप्रमुख प्रशांत तायडे, नितीन घोलप आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
     डिलक्स चौकातून ही पदयात्रा बी ब्लॉक, रिव्हर रोड, शगून चौक, साई चौक, वैष्णोदेवी मंदीर, आयप्पा मंदीर मार्गे जायका चौकात पदयात्रेची सांगता झाली.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात लांडेचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लांडे हे आमदार असताना इंद्रायणीनगर आणि परिसराचा विकास झाला. या भागातील शंभर टक्के मतदान विलास लांडे यांनाच देऊन विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना लांडे यांनी इंद्रायणीनगर, बालाजीनमधील अनेक प्रश्न सोडविले. सर्वांची कामे करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे विलास लांडे यांच्या स्वागतासाठी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर भागातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती. कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून कपबशीच्या विजयाचा जयजयकार करून जोरदार स्वागत केले. चौकाचौकात महिलांकडून विलास लांडे यांचे औक्षण करण्यात आले. लाडे यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांच्याकडून विजयासाठी शुभेच्छा घेतल्या.

इंद्रायणीनगर, लांडगेनगर, गुरूविहार पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा वसाहत, गणेशनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रोड, संतनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. डिस्ट्रिक्ट सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष सतीश थिटे, बाळासाहेब इचके, दत्तात्रय दिवटे, अशोक थोपटे, विठ्ठल माने, अशोक आहेर, संजय उदावंत, संजय भोसले, माणिक जैद, मेरी डिसुझा, अश्विनी वाबळे, संजय सातव यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे तसेच भाजप-शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील जनतेच्या डोळ्यासमोर आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकास हा केवळ कागदावरच राहिला आहे. आम्ही हे केले, ते केले म्हणून नुसते ढोल वाजविले जात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील नागरिकांची फसवणूक झाली आहे. आमदार असताना लांडे यांनी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर या भागातील नागरिकांवर कधी दादागिरी केली नाही. येथील नागरिकांना सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे काम त्यांनी केले. महापालिका निवडणुकीत या भागातून त्यांच्या मुलाचा मोठ्या फरकाने विजय झाला. विधानसभा निवडणुकीतही येथील जनता लांडे यांच्या सोबत उभी आहे. इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातून विलास लांडे यांच्या कपबशी चिन्हाला नागरिकांची पसंती आहे. येथील नागरिकांनी कपबशीलाच विजयी करण्याचे ठरविले आहे, असा विश्वास संजय वाबळे यांनी व्यक्त केला.” 
तळेगाव (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
- कार्ला येथील महालक्ष्मी सांस्कृतिक  मित्र मंडळातर्फे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस शेळके यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


रविवारी नाणे मावळात सुनिल शेळके यांचा प्रचारदौरा मतदारांच्या उत्स्फूर्त  प्रतिसादात पार पडला.  कार्ला येथील महालक्ष्मी मित्र मंडळाचे अध्यक्ष बबनराव इंगवले यांनी सुनिल अण्णा यांना मंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र दिले.  मावळ तालुक्याचा विकास केवळ सुनिल शेळके यांच्यासारखा तळमळीने काम करणारा नेताच करू शकतो,  असा आम्हाला विश्वास आहे,  त्यामुळे आमचा सक्रीय पाठिंबा सुनिल अण्णांना आहे ,  असे या पत्रात नमूद केले आहे. 


यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष किसन हुलावळे,  खजिनदार हरिभाऊ जमदाडे,  सेक्रेटरी अशोक चव्हाण,  सदस्य जयवंत केदारी,  लक्ष्मण जंगम,  राहुल पडवळ,  बाळू जंगम,  बंटी मोरे,  अमोल सुतार,  संतोष हुलावळे,  विष्णू हुलावळे,  बबन हुलावळे, पडवळ मामा,  धोंडिबा मोरे आदी उपस्थित होते.   


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
 : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ‘वीकएंड'ची संधी साधत वाकड, रहाटणी, थेरगाव परिसरातील सुमारे २० हून अधिक सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. मतासाठी नव्हे विकासासाठी आर्शिवाद द्या, अशी साद त्यांनी शनिवारी मतदारांना घातली. यावेळी झालेल्या बैठकांदरम्यान सोसायटीमधील रहिवाशांनी कलाटे यांचे दणक्‍यात स्वागत करीत त्यांना पाठींबा दिला. 
वाकड, थेरगाव, रहाटणी परिसरात आयटी क्षेत्रासह विविध ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सलग सुट्टीचे आल्याने आज कलाटे यांनी मतदारांशी संवाद साधला. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला गाठीभेटींचा दौरा रात्री दहाच्या सुमारास संपला. या दरम्यान कलाटे यांनी अनेक सोसायट्यांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेतल्या. पाणी, रस्ते, कचरा, वाहतूक अतिक्रमण अशा अनेक समस्या यावेळी नागरिकांनी मांडल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, तरुण, लहान मुले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कोणत्याही एका भागाचा विकास करण्याच्या मागे न लागता सर्व भागांचा हायटेक व शाश्‍वत विकास आपण साधू, अशी ग्वाही कलाटे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याला सोसायटीधारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. क्रिस्टल हाईटस्‌ा, ओमेगा, मधुबनसह विविध सोसायट्यांनी यावेळी पाठींबा दिला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची चाहूल लागली आहे. 

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)

पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज (सोमवारी) सकाळी चिंचवड स्टेशन परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या.
     सकाळी साडेदहा वाजता एम्पायर इस्टेट येथून प्रचाराला सुरूवात झाली. शिवसेना, भाजपा, आरीपीआय, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. एम्पायर गेट पासून ही पदयात्रा आनंदनगर झोपडपट्टी, साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन, काळभेरनगर येथे आल्यानंतर पदयात्रा संपली. मारूती अण्णा पंद्री, सचिन जाधव, स्वप्नील रोकडे, विभागप्रमुख अनिल पारचा, मनोज करोतिया, विष्णु साळवे, अनिस अत्तार आदी प्रमुख यामध्ये सहभागी झाले होते.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) : उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडची स्पोर्ट्‌स सिटी अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी आमदार महेश लांडगे यांनी चालविलेले प्रयत्न स्तुत्य असून त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी येथे व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ इंद्रायणीनगर भोसरी येथे आयोजित बैठकीत मडेगिरी बोलत होते. यानंतर मोशी, भोसरी प्राधिकरण परिसरात आमदार लांडगे यांचे प्रचारपत्रक वाटून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे भोसरी व खेड सहसंपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद] भोसरी शिवसेना प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेविका वर्षा मडेगिरी, कामगार नेते हनुमंत लांडगे, युवा नेते योगेश लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, पिंपरी चिंचवडची उद्योगनगरी, सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख आहेच. त्याबरोबरच शहराची स्पोर्ट्‌स सिटी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडासंकुल साकारात आहे. भोसरीतच बंदिस्त गॅलरी असलेले स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. इंद्रायणीनगरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटींग ग्राऊंडचे लोकार्पणही करण्यात आले आहे. जाधववाडी चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. च-होली येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. आण्णासाहेब मगर स्टेडीयमला गतवैभव प्राप्त करून देऊन पिंपरी चिंचवडचा नावलौकिक स्पोर्ट्‌स सिटी असा व्हावा यासाठी आमदार लांडगे प्रयत्नशील आहेत.
आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून परिसरनिहाय क्रिडासंकुले निर्माण करण्यात आली आहेत, असे सांगून इंद्रायणीनगरचे स्केटींग ग्राऊंड, गवळीनगर हनुमान कॉलनी येथील बॅडमिंटन कोर्ट, गावजत्रा मैदान भोसरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र तसेच भोसरी मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स गॅलरी, जाधववाडी रिव्हर रेसिडेन्सीजवळील चिखली मल्टीपर्पज स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, से. नं. 9 मोशी प्राधिकरण येथील बास्केटबॉल मैदान, से. नं. 4 येथील टेनिस कोर्ट आणि हॉलीबॉल, च-होली येथील जलतरण तलाव, से. नं. 10 भोसरी एमआयडीसी येथील तसेच से. नं. 19 शरदनगर चिखली येथील प्ले ग्राऊंड याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
आण्णासाहेब मगर स्टेडियमची 35 वर्षापूर्वी निर्मिती करण्यात आली. राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या पुढाकाराने हे स्टेडियम तयार करण्यात आले. मात्र त्यानंतर या मैदानाच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला गेला नाही. या मैदानावर शहरातील अनेक खेळाडू घडले. वाढत्या शहरीकरणाबरोबर क्रिडाविकासाची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारचे खेळ शिकविले जावेत यासाठी त्या मैदानावर स्पोर्ट्‌स युनिव्हर्सिटी करण्यात यावी असा आमदार महेश लांडगे यांचा संकल्प असून तो ते धडाडीने पूर्णत्वास नेतील असा विश्वास विलास मडेगिरी यांनी यावेळी व्यक्त केला.पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – गेल्या पाच वर्षांत फक्त भोसरी मतदारसंघासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही दादागिरी आणि दहशत प्रचंड वाढली आहे. त्याच्या बळावर अनेक चुकीची कामे सुरू आहेत. टक्केवारी आणि वाढीव खर्चाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट सुरू आहे. मोशी कचरा डेपो येथील नियोजित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, चिखलीतील संतपीठ, पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली भागातील रस्ते प्रकल्पांच्या मंजुरीत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. संतपीठसारख्या महान कामांतही यांनी पैसे खाल्ले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक प्रकल्पांमध्ये स्वतःची भागादारी करून कोट्यवधी रुपये लाटले आहेत. त्याच पैशांतून आज निवडणूक लढविली जात आहे. या पैशांतूनच सोशल मीडियावर लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या मनांवर विकासकामे केल्याचे बिंबवले जात आहे. अशा प्रवृ्त्ती पुन्हा निवडून आल्यास भोसरी मतदारसंघाचे काय होईल, याचा मतदारांनी विचार करावा. जागरूकपणे  अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी मासुळकर कॉलनी आणि नेहरूनगर भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक समीर मासुळकर यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेला सकाळी साडेनऊ वाजता सुरूवात करण्यात आली. पुढे रिलायन्स बिल्डिंग, आर सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, वास्तु उद्योग कॉलनी, नवनिर्माण मंडळ, उद्यमनगर, अंतरिक्ष कॉलनी, स्वप्ननगरी, यशवंतनगर झोपडपट्टी त्यानंतर नेहरूनगर , नूर मोहल्ला, ७८६ चाळ, वसंतदादा पाटील शाळा परिसर, क्रांती चौक, दोस्ती बेकरी, आंबेडकरनगर, शांती विहार, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प परिसरात पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप करण्यात आला.

लांडे यांच्या या पदयात्रेत चिमुकलेही सहभागी झाले होते. लांडे यांच्यासोबत सेल्फी काढून चिमुकल्यांनी पदयात्रेत उत्साह निर्माण केला. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे जागोजागी महिलांनी फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभागी होत विलास लांडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. लांडे यांनीही दहा वर्षे आमदार असताना भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध योजना, प्रकल्प राबवून मतदारसंघाचा कायापालट केल्याचे नागरिकांना सांगितले. विठ्ठलनगर झोपडपट्टीतील नागरिकांना चांगली घरे उपलब्ध व्हावीत यासाठी या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नागरिकांना सांगितले. तसेच कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून जनतेला मूर्खात काढणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन विलास लांडे यांनी नागरिकांना केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, “भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दहशत, दादागिरी आणि गुंडगिरीचा मुद्दा हा काही खोट प्रचार नाही. पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघात दादागिरी आणि दहशत नव्हती. कारण त्यावेळी विलास लांडे हे आमदार होते. ते सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करायचे. मात्र मतदारसंघातील जनतेने पाच वर्षापूर्वी एक चुकीचा निर्णय घेतला आणि दादागिरीचा उदय झाला. ही दादागिरी केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते. नियमात बसत नसलेली कामे दम देऊन करून घेतली जात आहेत. प्रत्येक प्रकल्पात कोट्यवधींची लूट झाली आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रकल्पात यांचीच भागीदारी आणि वरून टक्केवारी वेगळी घेतली जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी भागीदारी आणि टक्केवारीतून अमाप माया गोळा केली आहे. त्याच्याच जोरावर आताची विधानसभा निवडणूक लढविली जात आहे. जनतेच्या लुटलेल्या पैशांतून सोशल मीडियावर लाखो रुपये खर्च करून विकासकामे केल्याचे नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रकार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत मतदारसंघात खरंच विकास केला असता, तर त्यांना फ्लेक्सबाजी, पेपरबाजी आणि सोशल मीडियाची गरजच भासली नसती. विकास केलेलाच नाही म्हणून तर सगळीकडे नुसती प्रसिद्धी सुरू आहे. नागरिकांनी आता जागरूक होऊन मतदारसंघातील या दादागिरीला आणि दहशतीला आणि विकासकामे केल्याचे खोटे सांगण्यासाठी सुरू असलेल्या भंपकबाजीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे. 

या पदयात्रेत माजी महापौर हनुमंत भोसले, राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, नगरसेविका गीता मंचरकर, मधुकर मासुळकर, अमित भोसले, राम मासुळकर, सतीश भोसले, ऋषीकेश भोसले, अमजद इनामदार आदी सहभागी झाले होते.
पिंपरी, दि. १३ (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :– चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजाप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. १३) प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळेनिलख परिसरातील हौसिंग सोसायटीमधील पदाधिकारी व नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात हौसिंग सोसायट्यांतील नागरिकांनी निवडणुकीत आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

या कार्यक्रमाला हौसिंग सोसायटीमधील सुमारे ६०० नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी व्यासपीठावर येऊन आपल्या भागातील समस्या मांडल्या व त्याचबरोबर झालेल्या कामांबद्दल कौतुक देखील केले. नगरसेवक संदिपकस्पटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याने झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. तसेच निवडणुकीत आमदार जगताप यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच हौसिंग सोसायट्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्या एक-एक करून सोडवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीला सामोरे जाताना आपली विकासात्मक भुमिका त्यांनी सर्वांपुढे मांडली. कस्पटेवस्ती येथील काळेवाडी फाट्याजवळच्या प्राधिकरणाच्या जागेत खेळाचे मोठे मैदान उभारण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांनी निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीलाल ओसवाल यांनी केले. प्रसाद कस्पटे यांनी आभार मानले.


पिपंरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे उमेदवार विलास लांडे यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे, असे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, राष्ट्रवादी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे उमेदवार विलास लांडे, प्रदेश काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा शामला सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रसेच्या उपाध्यक्षा निगार बारस्कर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी आमदार अण्णा बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जैसवाल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, माजी अध्यक्ष विशाल कसबे, एन्‌.ए.बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी साठे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस महाआघाडीसोबत आहे. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यांचा प्रचारात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. परंतू चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे व भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या विनंतीवरून आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोन्ही पुरस्कृत उमेदवारांना शहर कॉंग्रेसच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे. पिंपरी विधानसभेप्रमाणे चिंचवड व भोसरी विधानसभेतही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील, असेही सचिन साठे यांनी सांगितले.

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

अखिल उत्तर भारतीय महासंघ के अध्यक्ष अमित गुप्ता ने पुणे में होने वाले आगामी 21 अक्टूबर को विधानसभा चुनाव के लिए बीजेपी व बीजेपी समर्पित पार्टी को अपना समर्थन पत्र सौंपा.

मौके पर मौजूद मेयर राहुल जाधव, नगरसेवक रवि भाऊ लांडगे, सचिन भैया लांडगे, नगरसेवक राजू लांडगे, नगरसेवक गोपी अप्पा धावडे, नगरसेवक सारिका ताई लांडगे,नगरसेवक  यशोदा ताई बोहिंदवाड, शिनसेना नेता इरफान भाई , बीजेपी महिला मोर्चा अध्यक्ष शेला मोलक मौजूद थे , सब लोगो ने  ये भरोसा दिलाया कि उत्तर भारतीय के साथ कोई भेद भाव ना रखते हुए हर सम्भव मदद दिया जाएगा.

अखिल उत्तर भारतीय महासंघ के अध्यक्ष अमित गुप्ता ने कहा कि बीजेपी ही ऐसी पार्टी है जो पुणे मे रह रहे सभी उत्तर भारतीय को हर सम्भव मदद प्रदान करती है व सबको साथ और सबका विश्वास लेकर चलती है. साथ ही भोसरी विधानसभा उम्मीदवार महेश लांडगे को एतिहासिक मतों से विजयी बनाने का संकल्प लिया गया.

अखिल उत्तर भारतीय महासंघ की टीम विजयशंकर पांडे, मंगल सिंह, धनंजय शर्मा, सुजीत विश्वकर्मा, रणधीर सिंह, अर्जुन केसरी, सतीश सिंह, जीवन चौबे, शोभा यादव, बी. टी. पांडे, राकेश त्रिपाठी, रामदेव विश्वकर्मा, गोपाल गुप्ता आदि मौके पर मौजूद थे.पिंपरी,  (टाईमन्युजलाईन नेटवर्क) – बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विलास लांडे हेच योग्य उमेदवार आहेत. 

या पाठिंब्यासंदर्भात गणेश आवारे म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघात शेकडो बांधकाम कामगार आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. उलट या बांधकाम कामगारांचे शोषण करण्याचेच काम झाले. या बांधकाम कामागारांची शोषणातून मुक्तता करून त्यांचे जीवनमान उंचावणारे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे हेच योग्य प्रतिनिधी आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सर्व बांधकाम कामगारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजी आमदार विलास लांडे यांना बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेकडून जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. 

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी विधानसभेच्या मतदारांना आजी व माजी या दोन्ही आमदारांनी फसविले असल्याचा सणसणीत आरोप पिंपरी विधानसभा मतदार संघाचे वंचित आघाडीचे उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी केला आहे.

वंचित आघाडीचे उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदार संघात त्यांच्या प्रचार रॅली सुरू असून तरुण कार्यकर्ते व महिलांचा त्यांना चांगला पाठींबा मिळत आहे.

पिंपरीतील एका कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना प्रविण  उर्फ बाळासाहेब गायकवाड  म्हणाले की "यापूर्वी पिंपरी विधानसभा मतदार संघाला दोन निष्क्रिय आमदार लाभले.या आजी व माजी दोन्ही आमदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदारांची फसवणूक केली आहे.झोपडपट्टी पुनर्वसन,तरुण व सुशिक्षितांची बेरोजगारी या प्रश्नाकडे त्यांनी डोळेझाक केली आहे.त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील जनतेने या फसविणाऱ्या आजी व माजी या दोन्ही आमदारांना घरी बसविले पाहिजे"

यावेळी पिंपरी चिंचवड शहर वंचित आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)

काँग्रेस मुक्त देश,राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र असे घोषणा भाजपने केली होती ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक्षात आणली. आघाडीने जातीपातीचे राजकारण केले. घराणेशाहीला प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी थेरगाव येथे केला 
थेरगाव येथे भाजपा उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ  सभा झाली त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे,अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप महापौर राहुल जाधव, एकनाथ पवार,
सदाशिव खाडे,उपस्थित होतेे

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, 

कांग्रेस मुक्त देश,राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र असे घोषणा भाजपने केली होती ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक्षात आणली. आघाडीने जातीपातीचे राजकारण केले. घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आहे.
परळी विधानसभेची उगाच काहीही चर्चा सुरु आहे, जशी बीड लोकसभेची होती. झालं काय हे पाहिलं. पिंपरी चिंचवड हे अमेरिका आहे. जागतिक पातळीवर नाव आहे. त्यामुळे भाजपने पिंपरी चिंचवड नाव स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट  केले
राष्ट्रवादीच्या घडाळ्यात 10 वाजून 10 मिनिटे असतात, हे घड्याळ 24 ऑक्टोबर ला कायमचे बंद करायचं. हेच एकमेव ध्येय आमचे आहे

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):


पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज सायंकाळी शाहूनगर-संभाजीनगर भागात पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या.
      सायंकाळी चार वाजता संभाजीनगर येथील दत्त मंदिरामध्ये जाऊन आमदार चाबुकस्वार यांनी हार घालून प्रचाराला सुरूवात केली.
      संभाजीनगर, रोटरी क्लब, साई गार्डन, सम्राट सोसायटी, कस्तुरी मार्केट, मॉरीस सोसायटी, अभिमान सोसायटी, पोटे कॉर्नर, सुबोध विद्यालय, सर्पोद्यान, कल्पतरू अपार्टमेंट, रत्नसिंधू सोसायटी, OPO हत्ती गार्डन, सिद्धीविनायक मंदिर, यश प्लाझा, शिवशंभो फाऊंडेशन कॉर्न अशा मार्गे पदयात्रा पुढं सरकत एचडीएफसी कॉलनी येथे समारोप करण्यात आला.
      सुमारे अडीच तास सुरू असलेल्या या पदयात्रेत नागरिकांनी ठिकठिकाणी आमदारांचे स्वागत करून तर महिलांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले. यावेळी आमदारांसमवेत शहर प्रमुख योगेश बाबर, संघटिका उर्मिला काळभोर, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक तुषर हिंगे, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, भाजपचे पिंपरी विधानसभा संयोजक राजु दुर्गे, मधुकर बाबर, ज्ञानेश्वर शिंदे, रोमी संधू, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, गोरख नवघणे, वैभव माने, प्रदिप साळुंखे, जितेंद्र वडुरकर, वैशाली माने, दिलीप सावंत, चंद्रकांत करडक, नारायण माने, दिलीप जाधव, संजय तोडकर आदी महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होत.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget