भिलार येथील पुस्तकांच्या गावाचा उपक्रम आता स्वतंत्र योजनेत रुपांतरित

सातारा:(टाईमन्युजलाईन नेटवर्क) वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी भिलार (जि. सातारा) येथे सुरु करण्यात आलेला पुस्तकांचे गांव हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            सातारा जिल्ह्यातील भिलार येथे 4 मे 2017 पासून पुस्तकांचे गाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात या गावाला दीड लाखांपेक्षा जास्त वाचक-पर्यटक आणि मान्यवरांनी भेट दिली. हा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या उपक्रमाचे 2019-20पासून योजनेत रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुस्तकाचे गाव योजना अस्तित्वात आल्याने अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद करता येणार आहे. त्यामुळे गावात वाचक-पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करता येणार आहेत. या बैठकीत योजनेसाठीच्या आवर्ती व अनावर्ती खर्चासह आवश्यक 5 पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget