रमेश तांबे
ओतूर,(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
नुकत्याच कोल्हापुर,सांगली जिल्ह्यात अतिवृष्ठी होवून पावसाच्या पुराने येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या जिल्ह्यात उद्भवलेल्या परस्थीतीमुळे व झालेल्या नुकसानीमुळे यावर्षीचा ओतूर येथील चैतन्य विद्यालय,गाडगे महाराज विद्यालय,सावीत्रीबाई फुले विद्यालयाने चालु वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करून समाजाला एक आदर्श घालुन दिला.तसेच विसर्जन मिरवुकीतील होणारा खर्च टाळुन एक हात पुरग्रस्थानसाठी हा उद्देश समोर ठेऊन नागरिकांना पुरग्रस्त भागातील विदायार्थ्यांंसाठी शालेय साहित्य मदतीचे अवाहन करण्यात आले होते त्यास नागरिकांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला.व मिरवणुकीतील होणारा खर्च टाळुन येथील गाडगे महाराज विद्यालय ,सावित्रीबाई फुले विद्यालय व चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांंनी टाळ मृदुंग वाजवत गणरायाला निरोप दिला.
मिरवणुकीचे आयोजन ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,गाडगे महाराज शिक्षण
संस्थेचे संचालक नितीन पाटील, गजानन महाराज शिक्षण मंडळाचे सचिव वैभव तांबे.यांंच्या मार्गदर्शनाखाली गाडगे महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यपिका मंगल साबळे,चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे,सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक बशीर शेख सर यांनी आपपल्या शाळेचे नियोजन केले होते.
या मिरवणुकीत तीनही विद्यालयातील सुमारे २५०० विद्यार्थी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ,पालक,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे,प्रदीप गाढवे,पंकज घोलप,अरूण वाकचौरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.मिरवणुकीत "मी एक पूरग्रस्त" हा देखावा सादर केला होता.या देखाव्याने प्रेक्षकांची मने वेधून घेतली. तसेच सुंदर असे स्लोगन तयार करण्यात आले होते.तिनही शाळांची भजनपथके सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत म्हणून तिनही शाळांमधील विद्यार्थांनी शैक्षणिक साहित्य दिले यामध्ये वह्या,पेन्सिल,कंपास पेटी,खोडरबर,दप्तर,रोख रक्कम असे भरपूर साहित्य जमा झाले.ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
गणपती बाप्पा मोरया ||पुढच्या वर्षी लवकर या ||अशा घोषणा देत अतिशय भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.