जिल्हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट
पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील रहिवाश्यांच्या घरांत पाणी घुसले होते व पुरांत सामान वाहून गेले होते. या भागातील नागरिकांना तात्पुरता निवारा, भोजन, चहा-नाश्ता पुरविण्याबाबत तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत जिल्हाधिकारी राम यांनी सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे असून प्रशासन आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासा त्यांनी दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, परीविक्षाधीन तहसिलदार श्वेता पवार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.