शिवस्वराज्य यात्रा संपेपर्यंत पक्षही संपेल-माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):-  शिरूर लोकसभेत माझा पराभव हा भावनेचे राजकारण, जातीय समीकरण वापरून झाला. निवडणूका संपून चार महिने झाले, अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभेसाठी किती वेळ काढला, भोसरीमध्ये किती वेळा आले, हडपसरमध्येही फिरकलेच नाही, त्यामुळे नागरिक आता पश्चाताप करत आहेत. याचाच फायदा आपल्याला  विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. शिवस्वराज्य यात्रा संपेल त्यावेळेस कोल्हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष ही संपणार असा विश्वास माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
भोसरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेतेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुरेश गोऱ्हे, शिरूर लोकसभा संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, उपशहरप्रमुख आबा लांडगे आदी उपस्थित होते.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, संभाजीराजे मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी भावनेचे राजकारण केले. तसेच जातीय समीकरण वापरले त्यामुळे आपला पराभल झाला. मात्र निवडणूका होऊन चार महिने उलटले अजून खासदार कोल्हे शिवस्वराज्य यात्रेतच आहेत. मात्र शिवस्वराज्य यात्रेदरम्यान ज्या ठिकाणी भाषणं झाली, त्या ठिकाणचे नेते आता दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा संपेपर्यंत पक्षही संपणार असल्याची टिका माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केली.
सभागृहामध्ये त्यांनी 37 दिवसांत 19 दिवस अनुपस्थिती लावली आहे. भोसरी आणि हडपसरला ते कितीवेळा आले. हडपसरमध्ये एका नगरसेवकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले, त्यानंतर ते फिरकलेच नाही. जो नेता नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळच देऊ शकत नाही, तो काय कामाचा अशा भावना नागरिकांमध्येही निर्माण झाल्या आहेत. याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला होणार असल्याचा विश्वास माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget