नारायणगाव (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
नारायणगाव येथील औटी तांबे मळा शिवारामध्ये दादाभाऊ गणपत भोर यांच्या शेतामध्ये तीन ते साडेतीन वर्षे वयाची बिबट मादी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मृतावस्थेत आढळली.
याबाबतची माहिती किरण महिपत तांबे यांनी वन विभागाला दिली त्यानुसार वनपाल एम जे काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्या चा पंचनामा केला. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बिबट्याची मादी व तिच्या शरीरावरील सर्व अवयव सुव्यवस्थित असून मृत बिबट मादीने काहीतरी विषारी खाद्य खाल्ल्याने किंवा आजारी असल्यामुळे ती दगावली असण्याची शक्यता काळे यांनी व्यक्त केली. मृत बिबट मातीचे शवविच्छेदन माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आले असून तिच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती वनक्षेत्रपाल अजय शिंदे यांनी दिली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.