कबड्डीत प्रगती करण्यासाठी खेळाडूंनी नवनव्या गोष्टींचा अंतर्भाव करावा; आमदार जगताप यांचे आवाहनपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – प्रो-कबड्डीमुळे मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला सुगीचे दिवस आले आहेत. चांगल्या कबड्डीपटूंचे करिअर घडू लागले आहेत. या खेळात प्रगती करायची असेल, तर नवनव्या गोष्टींचा अंतर्भाव करायलाच हवा, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. १६) केले.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून चिंचवड येथील रस्टन कॉलनीत ओपन जीम उभारण्यात आले आहे. त्याचे आमदार जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि. १५) लोकार्पण करण्यात आले. तसेच चिंचवडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाला आमदार निधीतून कबड्डी मॅट देण्यात आले. आमदार जगताप यांनी हे मॅट मंडळाकडे सुपूर्द केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक राजेंद्र गावडे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सदाशिव गोडसे, प्रसाद टोणपेकर, राजाराम गावडे, राहुल कापसे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.  

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “महाराष्ट्राच्या मातीतील असलेल्या कबड्डी खेळाला पूर्वीपासून लोकमान्यता आणि राजमान्यता होतीच. पण प्रो कबड्डीमुळे या खेळाकडे करिअर म्हणून बघायला भाग पाडले आहे. कबड्डीतील कौशल्ये, क्षणाक्षणाला निर्माण होणारी उत्सुकता व थरार हा कबड्डीच्या लोकप्रियतेचा गाभा आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक नावाजलेले कबड्डी खेळाडू घडले आहेत. अनेक नवे खेळाडू तयार होत आहेत. अशा खेळाडूंना या खेळात आणखी प्रगती करण्यासाठी त्यांना नवनव्या गोष्टी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाला कबड्डी मॅट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मंडळासोबत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू जोडले गेलेले आहेत. या सर्वांनी मॅटवर खेळणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी कष्ट घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रस्टन कॉलनीत उभारण्यात आलेल्या ओपन जीमचा परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.” 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget