मंचर (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पुण्याच्या आंबेगावमध्ये तीन मुलं घोडनदीत बुडाली. शोधकार्य सुरू आहे.
वैभव चिंतामण वाव्हळ (वय 16), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय 15) आणि प्रणय राजेंद्र वाव्हळ (वय 15) अशी तिन्ही मित्रांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आज दुपारी हे तिघे मीना आणि घोड नदीच्या संगमाजवळ पोहायला गेले होते. पाण्याचा प्रवाह अधिक असताना ही तिघे पाण्यात उतरले आणि पोहताना वाहून गेले. बराच वेळ झाला तरी तिघे घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा संध्याकाळी सहाच्या सुमारास नदी किनारी त्यांचे कपडे, चपला आणि इतर वस्तू आढळल्या. शोधकार्य सुरू आहे, मात्र अंधार पडल्याने व्यत्यय येतोय. Ndrf टीम ला पाचारण करण्यात आलंय.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.