मुंबई (टाईमन्युजलाईन नेटवर्क):गेले पाच वर्षे या भाजपाने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शेतकऱ्यांच्या नेत्यांना संपवण्यासाठी काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. लातूर येथे मुक्ताई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यादरम्यान मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरदेखील निशाणा साधला. “आमच्या बहिण काल म्हणाल्या की राष्ट्रवादी संपली. ज्या शहरात तुम्ही राहता तिथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. परळीचा आमदारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल,” असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. “महाराष्ट्राच्या मातीत येऊन भाजपच्या अध्यक्षांनी डंका पिटवू नये. आमच्या दैवताबद्दल एकही वाईट शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. ९३ मध्ये जेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शरद पवार यांनीच दंगली शांत करण्याची जबाबदारी पेलली. तुम्ही तर गुजारातमध्ये दंगली घडविण्याचे काम केले,” असंही ते यावेळी म्हणाले.
गेले पाच वर्षे या भाजपने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शेतकऱ्यांच्या नेत्यांना संपवण्यासाठी काम करत आहे. आमच्या बहिणाबाई काल म्हणाल्या की राष्ट्रवादी संपली. अहो ज्या शहरात तुम्ही राहता तिथे राष्ट्रवादीची सत्ता आहे
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.