चिंचवड मतदारसंघातील पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत




पिंपरी,(टाईमन्युजलाईन नेटवर्क)- विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र नागरिकांना शोधून काढून त्यांना लाभ मिळवून दिले जात आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल १३ हजार नागरिकांची नोंदणी करून, त्यातील सुमारे ५ हजार नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. आता या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करून घेता येणार आहेत. पैसे नसल्याने उपचार करू न शकणाऱ्या रुग्णांना आयुष्मान भारत योजना वरदान ठरणारी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपापल्या परिसरातील भाजप नगरसेवक तसेच प्रभाग स्वीकृत सदस्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २३, २७, २९ आणि ३१ मधील नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत चिंचवड मतदारसंघातील सुमारे १३ हजार नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात त्यातील सुमारे पाच हजार नागरिकांना योजनेसाठी पात्र ठरल्याचे कार्ड देण्यात आले आहेत. पिंपळेगुरव, काळेवाडी, रहाटणी आणि थेरगाव या भागात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नागरिकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, नगरसेविका माई ढोरे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा मुंढे, चंदा लोखंडे, अर्चना बारणे, मनिषा पवार, सविता खुळे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप गाडे, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, काळूराम बारणे, तानाजी बारणे, संजय मरकड, राज तापकीर यांच्यासह त्या त्या भागातील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget