उदापूर येथील सह्याद्री गणेश मंडळाचा शिवराज्याभिषेक दर्शवणारा हलता देखावा

रमेश तांबे

ओतूर,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):

उदापूर (ता.जुन्नर)
येथील सह्याद्री गणेश मित्र मंडळाने शिवराज्याभिषेक हा हलता देखावा सादर केला आहे.या देखाव्यात राज्याभिषेक दर्शवनारे चार प्रसंग साकारले असून प्रथम शिवराज्यभिषेक ठरल्या नंतर गागा भट्टांंना बोलावून त्यांच्या उपस्थित मंत्रोच्चारात राज्यांचे स्नान, त्या नंतर शिवाजी महाराजांचे विवाह,त्या नंतर महाराजांचा राज्याभिषेक आणि शेवटी शिवाजी महाराजांची भव्य अशी हत्ती वरून मिरवणूक असे चार प्रसंग एकूण ५० पेक्षा जास्त मुर्ती व २५ हलत्यामुर्तीच्या मदतीने मंडळाने हा देखावा सादर केला आहे.

सुमारे तीन लाख रूपयांंपेक्षा अधिक खर्च करून सह्याद्री गणेश मित्र मंडळाने हा देखावा साकार केला असल्याची माहिती साईनाथ भोर व मोहन वल्हवणकर यांनी दिली.

       या हलत्या देखाव्याचे उद्घाटन उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बबन कुलवडे यांच्या हस्ते व आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.गणशोत्सव काळात दैनंदिन सायंकाळी सात वाजे पासुन ते रात्री दहा वाजे पर्यंत हा देखावा सर्वाना पाहण्यासाठी सुरू केला जातो.
      हा हलता देखावा सह्याद्री गणेश मित्र मंडळाचे सभासद व कलाकार साईनाथ भोर,मोहन वल्हवणकर,आशिष जगताप,विकास शिरसाठ,सुधीर भास्कर,राजेंद्र शिंदे,लक्ष्मण शिंदे,अभिजीत ढमढेरे,मच्छिंद्र शिंदे,अमोल म्हसणे आदी सभासदांंनी मिळुन तयार केला आहे.
       तसेच गावातील प्रत्येक सामाजीक कार्यक्रमात मंडळाचे सभासदांंनी हिररीने सहभाग घेवुन सामाजीक बांधीलकी जपली जात आहे.नुकतेच सह्याद्री मंडळावे सरस्वती विद्यालयाच्या नुतन इमारतीसाठी पन्नास हजार रूपये देणगी जाहीर केली आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget